टॅरिफला विरोध करणारे मूर्ख! प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात 2000 डॉलर टाकणार, ट्रम्प यांची घोषणा

टॅरिफला विरोध करणारे मूर्ख! प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात 2000 डॉलर टाकणार, ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला. मध्यंतरी त्यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याला उद्योजक एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन नेत्यांनी विरोध केला. यामुळे ट्रम्प आणि मस्कमध्ये वितुष्टही निर्माण झाले. मात्र टॅरिफमुळे अमेरिका अरबो रुपयांची कमाई करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

टॅरिफला विरोध करणारे मूर्ख असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी श्रीमंतांना सोडून प्रत्येक अमेरिकन नागरिकांना मालामाल करण्याची घोषणा केली. अमेरिकेला टॅरिफमधून मिळणाऱ्या महसुलातून प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 2 हजार डॉलर देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटवरून एक पोस्ट करत त्यांच्या व्यापार धोरणावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. जे लोक टॅरिफला विरोध करत आहे ते मूर्ख आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच त्यांच्या सरकारने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत आणि आदरणीय देश बनवला आहे. महागाईचा मागमूसही नसून शेअर बाजारही विक्रमी स्तरावर पोहोचला आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅरिफमुळे अमेरिकेला ट्रिलियन डॉलर्स मिळत असून या पैशाचा उपयोग देशावरील 37 ट्रिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. प्रशासन लवकरच कर्ज फेडण्यास सुरुवात करेल आणि त्याचवेळी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना वगळून प्रत्येक अमेरिकन नागरिकांना किमान 2 हजार डॉलर लाभांश देण्यात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले. अर्थात ट्रम्प यांनी हा लाभांश कसा वितरित केला जाईल किंवा तो कधीपासून दिला जाईल, त्यासाठी किती उत्पन्न हवे याबाबत कोणताही तपशील दिलेला नाही.

याआधी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी ऑगस्टमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट टॅरिफमधून मिळणाऱ्या महसुलाचा वापर करून देशावरील 38.12 ट्रिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यावर आहे. मात्र आता ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले. ही रक्कम कराच्या रुपात दिली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune news – शेवाळवाडी चौकात पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला Pune news – शेवाळवाडी चौकात पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला सोमवारी सकाळी आग लागली. शेवाळवाडी चौकातील सिग्नलजवळ 9 वाजून 20 मिनिटांनी टँकरला आग लागली. आग...
जळगावात गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी, लाडू गँगचा हात?
आता बाजारातील महागड्या टोनरना करा बाय बाय, घरीच बनवा नैसर्गिक टोनर, जाणून घ्या
ChatGPT लोकांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहे, वाचा नेमकं काय घडलं?
ईव्हीएममधून मतचोरी करणारे नामर्दाची औलाद, बच्चू कडू यांचा घणाघात
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आता फक्त 5 रुपये खर्च करा, वाचा
मुंबईहून कोलकात्यासाठी निघालेल्या स्पाईसजेट विमानात तांत्रिक बिघाड, करावे लागले इमरजन्सी लँडिंग