मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचे प्रतिपदान
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेच्या दीपोत्सवाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे, सौ. शर्मिला ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे उपस्थित होत्या.
दीपोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा, आजची दिवाळी ही वेगळी आणि विशेष आहे. मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळे आनंदात रहा. प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत रहा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तमाम मराठी जनांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List