सातारा जिल्हा बँकेकडून पूरग्रस्तांना सव्वा कोटींची मदत
राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 22 लाख 56 हजार 599 रुपयांची मदत केली आहे.
बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पकार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत क पुनर्कसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात उद्भवलेल्या अतिकृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक नागरिक आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी बँकेने केलेल्या मदतीचा मोठा हातभार लागला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील म्हणाले, बँकेमार्फत 1 कोटी तसेच बँक अधिकारी व सेवक यांच्या एक दिवसाची पगाराची रक्कम आणि संचालक यांच्या एका सभा भत्याची अशी एकूण 1 कोटी 22 लाख 56 हजार 599 इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List