Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू

Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू

हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक दुर्देवी अपघात घडला आहे. एमिरेट्स एअरलाइनचे बोईंग 747 कार्गो विमानाचे लॅण्डिंग दरम्यान नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरुन घसरुन थेट समुद्रात पडले. यात दोघांचा मृत्यू झाला.

तुर्की मालवाहू एअरलाइन एअर एसीटीच्या मालकीचे हे विमान एमिरेट्सचे फ्लाईट EK9788 होते. स्थानीक पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ज्यापैकी एक एअरपोर्ट कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच विमानात असलेल्या चारही क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुर्घटना सकाळी 3.50 वाजता घडली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान धावपट्टीवर उतरताच ते तिथे उभ्या असलेल्या गस्ती वाहनाशी आदळले. धडक इतकी जोरदार होती की वाहन समुद्रात पडले आणि काही क्षणातच विमान धावपट्टी ओलांडून पाण्यात बुडाले.

फ्लाइट ट्रेकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 वरील माहितीनुसार, टक्कर झाली तेव्हा विमान अंदाजे ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करत होते. AirNavRadar ने जारी केलेल्या फोटोंमध्ये विमानाचा शेपटीचा भाग पूर्णपणे गायब असल्याचे दिसून आले आहे, तर उर्वरित विमान अर्धे बुडालेले दिसते.


हे विमान अंदाजे 32 वर्षे जुने होते आणि ते तुर्की कार्गो कंपनी एअरएसीटी द्वारे एमिरेट्ससाठी चालवले जात होते. हे कार्गो विमान दुबई अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत होते आणि त्यात कोणतेही प्रवासी नव्हते, फक्त चार क्रू मेंबर्स असल्याचे बोलले जातेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी
लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास...
ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratnagiri News – परतीच्या पावसात हरभरा, पावटा, तूर पीक घेण्यास शेतकरी सरसावला; भात कापणीबरोबर केली जाते वायंगणी शेती
Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी
Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
ICC Women’s World Cup 2025 – श्रीलंकेच्या कर्णधाराची विक्रमाला गवसणी, असं करणारी पहिलीच खेळाडू
उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?