जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

जायफळ आपल्या सौंदर्यासाठी कसे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

आपल्या किचनमध्ये काही पदार्थ हे फार सहजसुलभ उपलब्ध असतात. मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ घरगुती उपचारासाठी वापरण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दाढ दुखतेय दाढेत लवंग ठेवा हे आपण वरचेवर ऐकतोच.

त्वचेसाठी जायफळ हा पर्याय सर्वात बेस्ट मानला जातो. फायबर आणि थियामिनचा जायफळमध्ये समावेश असतो. त्यामुळेच जायफळचा उपयोग हा त्वचेसाठी करता येतो. तसेच व्हिटॅमीन बी 6, फॉलेट, कॉपर, मॅक्लिग्रॅन, मॅग्नेसिअम सारखे पोषक तत्व असतात. म्हणूनच जायफळ हे खूपच उपयुक्त आहे. केवळ इतकेच नाही तर, जायफळाचे तेल औषधांमध्ये सुद्धा वापरले जाते.

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

स्त्रियांसाठी असणारे कॉस्मेटिक मध्ये जायफळ तेल वापरलं जातं. हे तेल आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे, या तेलामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होतो. म्हणूनच खास टुथपेस्टमध्ये जायफळ तेलाचा वापर हा हमखास केला जातो. जायफळ मध्ये असलेले ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री गुण खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या तेलाचा उपयोग पाण्यात काही थेंब टाकून गुळण्या करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते त्याचबरोबर दातदुखीवर हे तेल रामबाण उपाय आहे.

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

आयुर्वेदात अनेक गुणकारी औषधं आहेत. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्याच जोरावर स्वतःचे आरोग्य उत्तम टिकवले होते. घरच्या घरी उपलब्ध असलेले अनेक पदार्थ खूप बहुमोली असतात. याचाच प्रत्यय आपल्याला आपल्या मसाला डबा पाहिल्यावर येईल. जायफळ हा मसाला वर्गातील असला तरी त्याचे फायदे खूप आहेत.

आहारामध्ये कडधान्य समाविष्ट करताना या टिप्सचा वापर करा, वाचा सविस्तर

असाच एक मसाल्याच्या डब्यातील पदार्थ म्हणजे जायफळ. मिरिस्टिका वृक्षाच्या बीला जायफळ असे म्हणतात. जायफळाचा वापर गोड पदार्थांची लज्जत वाढवायची असेल तर केला जातो. गोड पदार्थांना जायफळ शिवाय पर्याय नाही. जायफळाचे तेल आयुर्वेदात वापरले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी