पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा वारकरी सांप्रदाय सरकार विरोधात भूमिका घेईल, महाराज मंडळींचा इशारा

पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा वारकरी सांप्रदाय सरकार विरोधात भूमिका घेईल, महाराज मंडळींचा इशारा

प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर हा भाविकांसाठी, विकासकामांसाठी नसून पूर्णपणे व्यवसायिक दृष्टीकोनातून राबविण्याचे नियोजन शासन व प्रशासन करीत आहे. मात्र या विरोधात संपूर्ण राज्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आवाज उठविणार नसून प्रसंगी सत्ता बदलासाठी प्रचार देखील करणार असल्याच्या तीव्र भावना कॉरिडॉर विरोधात आयोजित सभेमध्ये विविध महाराज मंडळींनी व्यक्त केल्या. कॉरिडॉर तसेच डीपीला विरोध करण्यासाठी येथील संभाव्य बाधितांच्या वतीने स्थापित समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचे आयोजन केले होते. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज होते. व्यासपीठावर शिरवळकर महाराज, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ.महेश महाराज देहुकर, शंकर महाराज गलगलकर, रामकृष्ण महाराज वीर, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ.प्राजक्ता बेणारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, व्यंकटेश गलगलकर, ॲड.आशुतोष बडवे, सुमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी आवश्यक विकासकामे करण्यापेक्षा ज्याची मागणी नाही, तो कॉरिडॉर का लादला जात आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. सरकार आमच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळत असेल तर हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला गावागावात प्रचार करावा लागेल असा इशारा देखील महाराज मंडळींनी दिला.

तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी, बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत असा आरोप केला. आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत. 200 एकर जागा विना वापर पडून असल्याचा दावा करून येथे कॉरिडॉर राबवावा अशी मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;