ICMR चा अहवाल,भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक

ICMR चा अहवाल,भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक

भारतीय लज्जतदार जेवण त्याच्या स्वादासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतू इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) एका नवीन अहवालाने भारतीय जेवणातील पदार्थ रुचकर असले तरी आरोग्यासाठी पोषक नाहीत असे म्हटले आहे. भारतीय आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात आहे. आणि त्यात प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असल्याचे म्हटले आहे.

भारतीय आहारामुळे शरीराचे फारसे पोषण होत नाही. उलट या आहाराने देशातील लठ्ठपणा आणि डायबिटीजचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि स्नायू कमजोर होत चालले असल्याचे आसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे.

ICMR च्या रिपोर्टमध्ये नेमके काय म्हटले आहे ?

आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या वतीने केलेल्या या संशोधनात भारतीय लोकांच्या डाएटचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार झालेल्या संशोधनात असे आढळले की लोकांचे पोट तर या आहारने भरले जाते. परंतू शरीराला आवश्यक पोषण त्यातून मिळत नाही. अहवालानुसार रिपोर्टमध्ये हे समोर आले की भारतीय आहारात ६५ ते ७० टक्के कार्बोहायड्रेट असते. तर प्रोटीनचे प्रमाण केवळ १० टक्के असते. या अहवालानुसार भारतीय जेवणातील थाळीत भात, रोटी आणि बटाट्या सारखे कार्बोहायड्रेट पदार्थ प्रचंड प्रमाणात खाल्ले जातात.आयसीएमआरच्या मते त्यांच्या जास्त प्रमाणामुळे शरीरातील साखरेची पातळी खूप वाढते आणि फॅट जमा होते. त्यामुळे वजन वाढणे, थकवा येणे आणि डायबिटीजसारखे आजार होतात.

प्रोटीनच्या कमतरतेने कमजोरी

रिपोर्टनुसार प्रत्येक व्यक्तीला रोज ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. परंतू बहुतांशी भारतीयांच्या जेवणात केवळ ३५ ते ४० ग्रॅम प्रोटीन असते. डाळ, दूध, अंडी आणि सोयासारखे पदार्थ भारतीय ताटातून गायब आहेत. त्याचा परिणाम इम्युनिटी आणि मसल स्ट्रेन्थवर होत आहे. आयसीएमआरच्या रिसर्चनुसार दक्षिण भारतीय लोक तांदूळावर अवलंबून असतात.तर उत्तर भारतात गहूचा वापर सर्वाधिक होतो. तूर पूर्वोत्तर राज्ये आणि किनारी प्रदेशात मासे आणि नारळाने थोडे चांगले प्रोटीन मिळते. परंतू एकूण संपूर्ण देशाच्या डाएट संतुलनाचा अभाव आहे.

आयसीएमआरचा इशारा

आयसीएमआरने लोकांना आपल्या डाएटमध्ये सुधार करण्याचा इशारा दिला आहे. अहवालानुसार लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश केला नाही तर येणाऱ्या काळात आजारांचे प्रमाण वाढेल. आयसीएमआरने सल्ला दिला आहे की थाळीत २५ टक्के प्रोटीन, ५० टक्के कार्ब्स आणि २५ टक्के हेल्दी फॅटचे संतुलन राखणे गरजेचे आहे. तुम्ही रोज थाळीत डाळ, दूध, अंडी आणि दही सोया आणि भाज्यांचा समावेश करु शकता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जालना महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त जालना महापालिकेच्या आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त
जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेतील विविध...
अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…!
ICMR चा अहवाल,भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक
स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग, चिपळूणमध्ये संतापाची लाट
ज्ञानेश कुमार तोंड लपवून का बसले आहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय