मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का? की दुधाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून वाढतं?
ज्यांना शुगर आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना त्यांच्या खाण्या-पिण्याबद्दल फार खाळजी घ्यावी लागते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल कूप काळजी घेणे गरजेचे असते.कारण आहारात जर गडबड झाली तर त्यांच्या साखरेमध्ये खूप चढ-उतार होतात. तसेच अनेकदा असा प्रश्न असतो की मधुमेही रुग्ण दूध पिऊ शकतात का? कारण अनेकांच्या मानात असते की दूध प्यायल्याने शुगर वाढू शकते.
मधुमेही रुग्णांमध्ये दूध सेवन करावे की नाही याबद्दल अनेकदा गोंधळ असतो
मधुमेही रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, आहारातील कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करणे हे निरोगी फॅट्स आणि प्रथिने वाढवण्याइतकेच महत्वाचे आहे. आहारातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध हा सर्वोत्तम अन्न मानले जाते. परंतु दूधामुळे असणाऱ्या याच संभ्रमामुळे मधुमेही रुग्ण दूधाचे सेवन करण्यास घाबरतात. लोकांचा असा विश्वास आहे की दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेही रुग्णांमध्ये दूध सेवन करावे की नाही याबद्दल अनेकदा गोंधळ असतो. फुल क्रीम दुधात जास्त चरबी आणि कॅलरीज असतात, म्हणून डॉक्टर अनेकदा मधुमेही रुग्णांना स्किम्ड किंवा टोन्ड दूध पिण्याचा सल्ला देतात.
कोणत्या प्रकारचे दूध पिऊ शकतात जेणेकरून त्यांच्या रक्तातील साखर वाढणार नाही
दरम्यान 500 मिली दुधाचा ग्लायसेमिक लोड साडेसात असतो, जो फार जास्त नसतो. दुधाचा ग्लायसेमिक लोड कमी असला तरी, त्यात भरपूर पोषक तत्व देखील असतात. त्यात असलेल्या प्रमुख पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांचा समावेश आहे. जे शरीर निरोगी ठेवण्या मदत करतात. मग मधुमेही रुग्ण कोणत्या प्रकारचे दूध पिऊ शकतात जेणेकरून त्यांच्या रक्तातील साखर वाढणार नाही. जाणून घेऊयात.
मधुमेही रुग्ण कोणत्या प्रकारचे दूध पिऊ शकतात?
मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात फुल क्रीम दूध पिऊ शकतात. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दुधाचा ग्लायसेमिक इंडेक्स 27 ते 34 पर्यंत असू शकतो. जर 500 मिली फुल क्रीम अमूल दुधाच्या ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल बोललो तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 7.5 आहे जो खूप कमी आहे. दूध हे मधुमेही रुग्णांसाठी एक संपूर्ण अन्न आहे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांनी फुल क्रीम दूध प्यावे कारण त्यात मर्यादीत फॅट असते जे हृदयाचे रक्षण करते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी फुल क्रीम दूध प्यायल्याने काहीही धोका होणार नाही.
दुधाच्या सेवनामुळे साखरेचे प्रमाण वाढते का?
तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की दुधामुळे मधुमेह होत नाही. जरी तुम्हाला आधीच मधुमेह असेल तरी तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय दूध पिऊ शकता.फक्त त्यात साखर न घालता.
कोणताही त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List