‘या’ पदार्थांसोबत चुकूनही लिंबूचे सेवन करू नका, अन्यथा त्याचे आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

‘या’ पदार्थांसोबत चुकूनही लिंबूचे सेवन करू नका, अन्यथा त्याचे आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यात असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म शरीराला निरोगी आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. तसेच लिबांच्या सेवनाने तुमचे पचनक्रिया देखील सुधारते. तसेच त्वचेचा रंग सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

पण जर तुम्ही लिंबू या पदार्थांसोबत खाल्ले तर ते शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकते. यामुळे ॲलर्जी, गॅस आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. लिंबूसोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे जाणून घेऊयात.

दुग्धजन्य पदार्थ

लिंबूमधील आम्ल दूध किंवा दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे विघटन करू शकते, ज्यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते. यामुळे गॅस, आम्लता, पोटात जडपणा आणि त्वचेवर रिॲक्शन यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात.

अंड्यांसोबत लिंबू खाऊ नका

अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत परंतु अंड्यांसोबत लिंबू खाल्ल्यास हे मिश्रण काही लोकांमध्ये ॲलर्जी किंवा पचनाच्या समस्या निर्माण करू शकते. हा परिणाम विशेषतः कच्च्या किंवा कमी शिजवलेल्या अंड्यांमध्ये जास्त होतो.

आंबट फळांसोबत लिंबू खाऊ नका

लिंबू, आंबा आणि चिंच हे सर्व प्रकार आंबट स्वभावाचे असतात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने जास्त प्रमाणात पोटात आम्लता निर्माण होते ज्यामुळे पोटदुखी आणि अल्सरची समस्या निर्माण होऊ शकते.

गोड फळांसोबत लिंबू खाऊ नका

गोड फळांसोबत लिंबू खाल्यास लिंबूमधील आम्ल हे गोड फळांमधील असलेली नैसर्गिक साखर एकत्र येऊन किण्वन प्रक्रिया सुरू करू शकते, ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

व्हिनेगर, काकडी आणि टोमॅटोसोबत लिंबू खाऊ नका

व्हिनेगर, काकडी यांचा थंड प्रभाव असतो आणि त्यापैकी व्हिनेगर आणि टोमॅटोमध्ये आधीच आम्ल असते. अशा वेळेस या पदार्थांसोबत लिंबाचा रस मिक्स केल्याने आम्लतेची समस्या वाढू शकते आणि पोटात जळजळ किंवा छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मसालेदार पदार्थांसोबत लिंबू खाऊ नका

मसालेदार पदार्थांमध्ये लिंबाचा रस मिक्स करून सेवन केल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे गॅस, छातीत जळजळ आणि अल्सर होऊ शकतात.

हळदीसोबत लिंबू खाऊ नका

हळद आणि लिंबू दोन्ही पॉवरफूल नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत, परंतु त्यांचे एकत्र सेवन केल्याने काही लोकांमध्ये त्वचेची ॲलर्जी, जळजळ किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

लिंबू खाणे तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य अन्नासोबत सेवन केले जाऊ शकते. चुकीच्या फुड कॉम्बिनेशनमुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बस सर्वात कमी, भविष्यात आकडा शून्य होण्याची भिती
बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी म्हणजे फक्त 333 इतकी झाली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली...
मानव आणि बिबट्यांचे संघर्ष रोखण्याठी बिबट्यांचे निर्बीजीकरण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?