रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, शिवसेनेची पालिकेकडे जोरदार मागणी

रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा, शिवसेनेची पालिकेकडे जोरदार मागणी

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विकासाची रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने पालिकेकडे आज केली. याबाबत शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी रखडलेली विकासकामे, सोयीसुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिले.

शिवसेनेच्या मागणीमुळे प्रयाग नगर, प्रकाश नगर, वाशीनाका येथील आरएमसी प्लांटला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर गव्हाण गाव चेंबूर येथील  पाणी प्रश्न सोडवावा, गोवंडी शताब्दी रुग्णालयाचे खासगीकरण न करता सोयीसुविधा वाढवाव्यात, डॉक्टर-औषध पुरवठा वाढवावा, कोळीवाडा, देवनार गाव या ठिकाणच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणीही करण्यात आली. या वेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभागप्रमुख व आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, विठ्ठल लोकरे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक गजानन पाटील, निमीष भोसले, नीलम डोळस, निरीक्षक विनायक म्हात्रे, शाखाप्रमुख किरण म्हात्रे, उमेश करकेरा, संदीप वेताळे, महिला शाखा संघटक दक्षता पाताडे, उपविभाग अधिकारी व खासदार प्रतिनिधी रुपेश मढवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;