मारिया मचाडो यांना मिळाले शांततेचे नोबेल, ट्रम्प यांचा स्वप्नभंग

मारिया मचाडो यांना मिळाले शांततेचे नोबेल, ट्रम्प यांचा स्वप्नभंग

व्हेनेझुएलायच्या मारिया कोरिना मचाडो या बहाद्दूर महिलेला आज शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हक्कांसाठी आणि देशाला शांततेच्या मार्गाने हुकूमशाहीतून लोकशाहीकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांसाठी मारिया कोरिना मचाडो यांची सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली. या निवडीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्काराचे स्वप्न भंगले. विविध देशांमधील युद्ध थांबवल्याचा दावा करून, पॅम्पेन राबवून, दबाव टाकूनही ट्रम्प यांना नोबेल मिळालेले नाही. ट्रम्प यांच्या दबावापुढे नोबेल समिती झुकली नाही.

नोबेल समितीने ओस्लो येथे शुक्रवारी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली. या प्रतिष्ठत पुरस्कारासाठी 338 नामांकने आली होती. त्यामध्ये 244 व्यक्ती आणि 94 संस्थांचा समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प, आपण जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करत आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते. ‘माझे ओव्हल ऑफिस जगभरातील सर्व शांतता करारांचे केंद्र बनले आहे. जानेवारीमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वीच रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष संपवण्यासाठी मी वाटाघाटी सुरू केल्या होत्या,’ असे ट्रम्प म्हणत होते. याचबरोबर अनेक देशांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून पाठिंबाही दिला होता. मात्र नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

व्हाईट हाऊसचे नोबेल समितीवर टीकास्त्र

ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाकारण्यात आल्याने व्हाईट हाऊसने थेट नोबेल पारितोषिक समितीवर टीकास्त्र सोडले आहे. नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये नमूद केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यापुढेही शांतता करार करत राहतील, युद्धे संपवतील आणि जीव वाचवतील. त्यांच्याकडे मानवतेचे हृदय आहे आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते पर्वतही हलवू शकतात, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

व्हेनेझुएलाची आयर्न लेडी

व्हेनेझुएलाच्या ‘आयर्न लेडी’ अशी मारिया कोरिना मचाडो यांची ओळख आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी व्हेनेझुएलामध्ये अथक प्रयत्न केले आहेत. मारिया कोरिना मचाडो यांचे नाव ‘टाइम’ मासिकाच्या 2025च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक
हिंदुस्थानमध्ये आयसीसी महिला वर्ल्डकप सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या दोन महिला खेळाडूंसोबत मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये...
राजस्थानमधून फुगे विकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून व्यापाऱ्याला विकण्याचा प्रयत्न उधळला, आरोपीला अटक
ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर; टीएमटीचा गल्ला अर्ध्यावर, प्रवासी नसल्याने बसेस रिकाम्या धावू लागल्या
पालघर, डहाणू विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी जाहीर
भेकराची शिकार भोवली; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाला अटक, मांस फ्रीजमध्ये ठेवले
भाजपने जैन समाजाला फसवले, आता धडा शिकवायची वेळ; नीलेश नवलखा यांचे खासदार मोहोळांवर आरोप
बोगस नावे घुसवणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करा! नवी मुंबईत मतदार यादी विक्रीला? मनसेची पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक