शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे! शिवसेनेची डरकाळी मराठवाड्यात घुमली; जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे! शिवसेनेची डरकाळी मराठवाड्यात घुमली; जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन

‘शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मिळालेच पाहिजे, शेतकर्‍याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे…’ अशा गगनभेदी घोषणांनी बुधवारी (८ ऑक्टोबर २०२५) मराठवाडा दुमदुमला! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारच्या कानावर घालण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रलयंकारी पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला. तब्बल ३२ लाख हेक्टरवरील खरीप पिके अतिवृष्टीच्या तडाख्याने नेस्तनाबूत झाली. शेकडो हेक्टर जमीन खरवडून गेली. विहिरी बुडाल्या, जनावरे वाहून गेली. महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले. लाडक्या बहिणींना ४५ हजार कोटी रुपये देणार्‍या फडणवीस सरकारने शेतकर्‍यांसाठी मात्र तिजोरी बंद केली. मदतीच्या नावाखाली ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. हे पॅकेज म्हणजे मृगजळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटली.

शेतकर्‍यांचा आक्रोश कुंभकर्णी झोपेत असलेल्या फडणवीस सरकारच्या कानावर घालण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच बीड, लातूर, धाराशिव येथेही जिल्हाधिकारी कार्यालयावर तर तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ‘शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, शेतकर्‍याचा सातबारा कोरा करा’ अशा घोषणांनी शिवसैनिकांनी आसमंत दणाणून सोडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा