शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी घेण्यात आली होती. आता या सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली असून याबाबतची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील कबिल सिब्बल यांनी न्यायालयात पुढील तारीख देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने या सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून लेखी युक्तीवाद देण्यात आला होता. आता अंतिम सुनावणीवेळीही हा युक्तीवाद न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणावर निकाल देण्यात येणार आहे. आता याबाबत 12 नोव्हेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List