‘यूपीआय’साठी आता ‘पिन’ टाकायची गरज नाही, चेहरा किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट होणार

‘यूपीआय’साठी आता ‘पिन’ टाकायची गरज नाही, चेहरा किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट होणार

सध्याच्या डिजिटल युगात अनेक जण गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा यूपीआयवरून पेमेंट करतात. यूपीआय पेमेंट करताना चार अंकी पिन नंबर टाकावा लागतो. त्यासाठी पिन नंबर लक्षात ठेवणे गरजेचे असते. मात्र आता त्याची गरज नसेल. कारण युजर्स आपला चेहरा (फेशिअर रिकग्निशन) किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटला मंजुरी देऊ शकतील. ही सुविधा 8 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे यूपीआय पेमेंट अधिक सुरक्षित होणार आहे.

तज्ञांच्या मते हा बदल म्हणजे डिजिटल प्रवासातील माईलस्टोन ठरेल. तुमची ओळख हाच तुमचा पासवर्ड बनेल. यूपीआय नेटवर्कचे संचलन करणाऱ्या ‘एनपीसीआय’तर्फे या अत्याधुनिक सुविधेचे सादरीकरण मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये करण्याची योजना आहे. अद्याप ‘एनपीसीआय’ने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

नागरिकांना नेमका काय फायदा होणार?

  • सुरक्षितता ः फसवणूक आणि सायबर गुह्यांचा धोका कमी होईल.
  • सुलभता ः व्यवहार जलद आणि सहज होतील.
  • समावेशकता ः ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना डिजिटल व्यवहाराची संधी.

यूपीआय पेमेंटसाठीची ही नवी बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणाली पूर्णपणे ‘आधार’वर आधारित असेल. जेव्हा एखादा युजर चेहरा किंवा फिंगरप्रिंट सुविधेचा वापर करेल, तेव्हा त्याचे व्हेरिफिकेशन ‘आधार’वर असलेल्या बायोमेट्रिक डेटावरून केले जाईल. म्हणजे ज्या व्यक्तींचे बँक खाते किंवा यूपीआय आयडी ‘आधारकार्ड’ला जोडलेले असेल, त्याच व्यक्ती अशा पद्धतीने यूपीआय पेमेंटला मंजुरी देऊ शकतील.

बायोमेट्रिक डेटा वापरून युजर्संची ओळख पटवली जाईल. त्यानंतर युजर्संचा बायोमेट्रिक डेटा एक ‘एनक्रिप्टेड की’मध्ये रूपांतरीत होईल. ही ‘की’ बँकेकडे पाठवली जाईल, जिथे ती सत्यापित होईल आणि व्यवहार पूर्ण होईल.

यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या देशभरात वाढत आहे. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये यूपीआयवरून पेमेंट करण्याच्या संख्येत 31 टक्के वाढ झालीय. या महिन्यात एकूण व्यवहाराची संख्या 19.63 अब्ज म्हणजेच 24.90 लाख कोटी पर्यंत झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ही 24.85 लाख कोटी होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे
आरोग्याची वेळीच काळजी न घेतल्यास त्याचे भविष्यात फार गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे काही पदार्थ खातानाही विचार करायला हवा. असे...
रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत
राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद
शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम