ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने शोधल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण पाली, प्रसिद्ध चित्रकारावरून ठेवलं नाव

ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने शोधल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण पाली, प्रसिद्ध चित्रकारावरून ठेवलं नाव

तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनला आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण पालींचा शोध घेण्यात यश आलं आहे. महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील दोन पालींचा शोध ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने घेतला आहे. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि डॉ. ईशान अगरवाल यांचा समावेश आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच कुळातील चार पालींचा शोधही ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने घेतला होता.

नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरून त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केला आहे. यातील एका पालीचे नाव प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या नावावरून निमास्पिस व्हॅनगॉगी असं ठेवण्यात आलं आहे. कारण, या पालीच्या अंगावरील रात्रीच्या आकाशात चमचमणाऱ्या तारकांसारखी रंगसंगती आढळते. ही रंगसंगती व्हॅन गॉग यांच्या प्रसिद्ध द स्टारी नाईट या पेंटिंगसारखी असल्याने तिला हे नाव देण्यात आलं आहे.

तर दुसऱ्या पालीचं नाव निमास्पिस सातुरागिरीन्सिस असं ठेवण्यात आलं आहे. कारण या पाली सातुरागिरी डोंगररांगातच आढळतात. निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोटय़ा भूप्रदेशावरती विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमित असते. निमास्पिस सातुरागिरीन्सिस या पाली श्रीविल्लीपुतुर जंगलांत प्रामुख्याने दिवसाच्या थंड वेळी खडक, झाडे किंवा मानवी वस्तीतील इमारतींवर आढळता. या पालींमध्ये नर आणि मादी यांच्या रंगात फरक आढळून येतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अदा शर्मा आहे इतक्या कोटी संपत्तीची मालकीन, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर अभिनेत्री.. अदा शर्मा आहे इतक्या कोटी संपत्तीची मालकीन, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर अभिनेत्री..
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 2023 मधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने मोठा धमाका केला. द केरळ...
घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्री शेअर केला ‘हा’ फोटो, पतीसोबतच्या वादानंतर..
एकत्र या आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवा, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचे जनतेला आवाहन
Video भाजपच्या पोल बुथ एजंटच्या किटमध्ये सोन्याची बिस्कीटे
Video : ते परत महाराष्ट्रात आले? शरद पवार यांचा मोदींना खोचक टोला
रत्नागिरी शहरात पाणी कपात, शीळ धरणात २० टक्केच साठा
हा तर हुकुमशाहीविरोधातील बदलाचा संकेत – आदित्य ठाकरे