जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या

धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको आहे. त्यासाठी अनेक जण सकाळ आणि संध्याकाळी जिममध्ये कसरत करतात. घाम गाळतात. काही जण योगा, मेडिटेशन, डायटिंग, झुंबा क्लास,एरोबिक्स आणि जिमकडे वळतात. लहानथोर सगळेच मैदानावर, जिममध्ये घाम गाळताना दिसतात. महिलांचे सुद्धा जिममध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहेत.

आता जिमचा ट्रेंड हा मोठ्या शहरातच नाही तर लहान गावांपर्यंत पोहचला आहे. त्याला फॅड म्हणता येणार नाही कारण अनेकजण अगदी प्रामाणिकपणे जिममध्ये जातात. मेहनत घेतात. व्यायाम करतात. पण व्यायाम करताना जर जखमी झाले तर आपण दवाखान्यात जातो. जर इजा गंभीर असेल तर मग वैद्यकीय तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. अशावेळी एखादा विमा मदतीला येऊ शकतो का, त्यातून व्यक्तीचा इलाज, उपचाराचा खर्च करता येतो का? जिमसाठी असा खास विमा असतो का? ॲक्सीडेंटल प्रकरणात, अपघातात उपचार करता येईल अशी विमा पॉलिसी आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काय आहे त्याचे उत्तर?

जर तुमचा जिममध्ये अपघात झाला. तर तुम्ही अशा पॉलिसीजशी जोडलेल्या नेटवर्क रुग्णालयात दाखल होऊ शकता आणि उपचार करू शकता. तुम्हाला कॅशलेस उपचार मिळू शकतात. यामध्ये हातावर अथवा पायावर डंबल पडून गंभीर जखम झाली असेल, मोठ्या यंत्राचा जबर धक्का लागून इजा झाली असेल. रुग्णालयात भरती व्हावे लागत असेल तर त्याचा खर्च विमा कंपनी करते. काही पॉलिसी या एका दिवसाच्या वा 24 तासासाठी विमा देतात.

अर्थात या विम्याला काही मर्यादा पण आहेत. म्हणजे जिममधील अतिउत्साही प्राण्याने काही अजब धाडस केले, त्यातून तो जखमी झाला, ड्रग्स, दारूच्या अंमलाखाली जिममध्ये व्यायाम केला, तसे आढळले तर विमा नाकारल्या जातो. तर काही आरोग्य विमा कंपन्या व्यावसायिक आणि साहसी खेळांमध्ये ज्या गंभीर जखमा होतात अथवा खेळाडूला गंभीर इजा होते, त्यासाठी कोणतीही मदत करत नाही. भारतातACKO आरोग्य विमा कंपनी आणि बजाज एलियांज या जिम आणि खेळासाठी काही खास विमा पॉलिसी देतात. या योजनेचा संपूर्ण तपशील या कंपन्याच्या कार्यालयातून मिळू शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल
दिल्ली मेट्रो गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरतायत दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणारे दिल्लीकर. कारण मेट्रोमधून...
चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी
सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान, थोड्याच वेळात पार पडणार शपथविधी सोहळा?
मीच होणार बिहारचा पुढील मुख्यमंत्री, तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास
Gen Z आंदोलकांनी हॉटेलला आग लावली, पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू
IND Vs PAK Asia Cup 2025 – पाकिस्तानशी क्रिकेट आणि व्यापार करू नये, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका
‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी