बिहारमध्ये हाय अलर्ट; जैशचे तीन दहशतवादी नेपाळमधून घुसले, सीमावर्ती जिह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

बिहारमध्ये हाय अलर्ट; जैशचे  तीन दहशतवादी नेपाळमधून घुसले, सीमावर्ती जिह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून हिंदुस्थानात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर बिहार पोलीस मुख्यालयाने राज्यभरात हाय अलर्ट जारी केला आहे. रावळपिंडीतील हसनैन अली, उमोरकोट येथील अदील हुसैन आणि बहावलपूरमधील मोहम्मद उस्मान अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

या दहशतवाद्यांनी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश केल्याचे समोर आल्यामुळे राज्य पोलीस मुख्यालयाकडून सीमावर्ती भागातील जिह्यांच्या पोलीस अधीक्षकांना सतर्क करण्यात आले आहे. नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे सातत्याने स्पॅन करण्यात येत असून डिजिटल यंत्रणांच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. राज्य पोलीस मुख्यालयाच्या सूचनांनुसार सीमावर्ती जिह्यांना अतिरिक्त सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे तिन्ही दहशदवादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडू येथे पोहोचले तर गेल्या आठवड्यात बिहारमध्ये दाखल झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना देशाच्या कोणत्याही भागात घातपात घडवून आणण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे सुरक्षा वाढवली

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा संस्था सतर्क झाल्या असून कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींबद्दल पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस मुख्यालयाने केले आहे. दरम्यान, महाबोधी मंदिर संकुल, विश्व शांती स्तुप, महावीर मंदिर, श्री हरी मंदिर जी आणि पाटणा साहिब येथे मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे सुरक्षा वाढवली आहे.

दहशतवाद्यांची नावे, फोटो सार्वजनिक केले

पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांची नावे तसेच छायाचित्रे सार्वजनिक केली आहेत. त्यांच्या पासपोर्टशी संबंधित माहितीही सर्व पोलीस ठाणी तसेच गुप्तचर यंत्रणांना पाठवण्यात आली आहे. सीतामढी, मधुबनी, पश्चिम चंपारण, अररिया, किशनगंज आणि सुपौल या सीमावर्ती जिह्यांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्रत्येकी 50 हजारांचे बक्षीस

बिहारमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस चंपारण जिल्हा पोलिसांनी जाहीर केले आहे. नागरिक 112 किंवा 9431822988 आणि 9031827100 या हेल्पलाइन क्रमांकांवर माहिती देऊ शकतात असे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय? 80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय?
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका नव्या कायद्यामुळे एका माजी राष्ट्रपतींना सर्व सरकारी सुविधांना रामराम करावा लागत आहे. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे...
Breaking news – दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी
नाशिकमध्ये शिवसेना, मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाला सुरुवात; मोर्चात संजय राऊत, बाळा नांदगावकर सहभागी
झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?
छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्याने केदारनाथ धाम भाविकांनी फुलले
दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यायाधीश, वकिलांना सुखरूप बाहेर काढलं, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल