मस्कने चॅटजीपीटी आणि अॅपलला कोर्टात खेचले
अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या ‘एक्सएआय’ कंपनीने ‘अॅपल’ आणि ‘चॅटजीपीटी बनवणाऱ्या ‘ओपनएआय’ कंपनीला कोर्टात खेचले आहे. एआय मार्केटमध्ये आपले वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून या कंपन्या प्रतिस्पर्धांना रोखण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत मस्क यांच्या कंपनीने अमेरिकेच्या टेक्सास फेडरल कोर्टात धाव घेतली आहे.
अॅपल आणि ओपनएआय कंपन्यांनी बाजाराला ‘लॉक’ केले आहे. जेणेकरून एक्स आणि एक्सएआय यासारख्या कंपन्या स्पर्धेत उतरू नये, असे मस्क यांच्या कंपनीच्या वतीने खटल्यात म्हटलेय. यावर अॅपलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List