टेन्शन वाढले! तैवानच्या समुद्रात चिनी लष्कराच्या हालचाली
तैवानच्या सामुद्रधुनीजवळ चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्याने तैवान सतर्क झाला आहे. त्यानंतर तैवानने आपली क्षेपणास्त्रविरोधी हवाई यंत्रणा सज्ज केली आहे.
तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तैवानच्या सामुद्रधुनीजवळ 13 चिनी लष्करी विमाने, 6 नौदल जहाजे आणि एक सरकारी जहाज दिसले. त्यानंतर तैवानच्या लष्करानेही लढाऊ विमाने सज्ज केली असून नौदलाची जहाजे तैनात केली आहेत. तसेच क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे.
चिनी लष्कराच्या हालचाली हा त्यांच्या ‘ग्रे झोन’ रणनीतीचा भाग आहे. तैवानवर दबाव आणण्याची ही रणनीती आहे. सैन्य हळूहळू वाढवून तैवानला घेरण्याचा व त्यांची प्रतिहल्ल्याची क्षमता जोखण्याचा हेतू यामागे आहे, असे ‘तैवान न्यूज’ने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List