उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी, बाप्पाचे घेतले दर्शन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून उद्धव ठाकरे यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी आमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी ते स्विकारत राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. तेव्हा राज ठाकरे यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीलीत आसनासमोर नतमस्तकही झाले होते.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सहकुटुंब राजसाहेब ठाकरे ह्यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. pic.twitter.com/8VNdHbuu59
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 27, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List