केसाची वाढ करायची असेल तर ‘हे’ करून पहा
n केसामुळे सौंदर्य खुलून दिसते. जर तुम्हाला केसाची वाढ करायची असेल तर त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. दररोजच्या आहारात अंडी, मासे, कडधान्ये आणि डाळी यांसारख्या प्रथिनांचे सेवन वाढवा. जास्त गरम पाण्याने केस धुणे किंवा हेअर ड्रायरचा जास्त वापर करणे टाळा.
n रोजच्या जेवणात ताजी फळे, भाज्या आणि सुका मेवा खा. आवळा, रताळे, मेथी, कढीपत्ता, बेरी आणि ड्राय फूट्स आहारात असायलाच हवीत, याकडे विशेष लक्ष द्या. मांसाहारी असाल तर आहारात मासे खा. नारळ तेल गरम करून त्याने टाळूवर मसाज करा. मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासाने धुवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List