लिफ्ट कोसळली; जरांगे यांना दरवाजा तोडून बाहेर काढले

लिफ्ट कोसळली; जरांगे यांना दरवाजा तोडून बाहेर काढले

बीड थील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या भेटीसाठी जात असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि इतर कार्यकर्ते असलेली लिफ्ट बिघडल्याने जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. आदळलेल्या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मनोज जरांगे बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. कार्यकर्त्यांसह लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात असताना पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडली आणि काही समजण्याच्या आत खाली आदळली. लिफ्ट खाली आदळताच मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱयांना बाहेर काढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

असं झालं तर…जीमेलचा पासवर्ड विसरलात.. असं झालं तर…जीमेलचा पासवर्ड विसरलात..
तुम्ही तुमचा जीमेल पासवर्ड विसरला असाल तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या  गोष्टी करून  तुम्ही जीमेल अकाउंटमध्ये काही मिनिटांत पुन्हा...
अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले, वॉरेन बफे यांना धक्का; 31,600 कोटी गमावले
ट्रेंड रील – चिमुकलीचा डान्सचा रील व्हायरल, मिळतोय तुफान प्रतिसाद
हे करून पहा – नवीन चप्पल खराब झाल्यास…
मुनीरने डोनाल्ड ट्रम्प यांना गंडवलं! तेलाचे साठे पाकिस्तानचे नव्हे, बलुचिस्तानचे; बलोच नेते मीर यार यांचा अमेरिकेच्या करारावर आक्षेप
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
पित्याच्या वेतनातून मुलीची कॉलेजची फी भरा, हायकोर्टाचे खासगी कंपनीला आदेश; इंजिनीअर होऊ न देणे दुर्दैवी