मुनीरने डोनाल्ड ट्रम्प यांना गंडवलं! तेलाचे साठे पाकिस्तानचे नव्हे, बलुचिस्तानचे; बलोच नेते मीर यार यांचा अमेरिकेच्या करारावर आक्षेप

मुनीरने डोनाल्ड ट्रम्प यांना गंडवलं! तेलाचे साठे पाकिस्तानचे नव्हे, बलुचिस्तानचे; बलोच नेते मीर यार यांचा अमेरिकेच्या करारावर आक्षेप

अमेरिका व पाकिस्तानमध्ये झालेल्या तेल करारावर बलूच नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘तेलाचे साठे पाकिस्तानात नव्हे तर बलुचिस्तानात सापडले आहेत. त्यावर पाकचा कुठलाही अधिकार नाही. पाकचे लष्करप्रमुख आसीम मुनीर याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या संपूर्ण सरकारला गंडवले आहे, असा दावा बलोच नेते मीर यार यांनी केला आहे.

मीर यार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पाकिस्तान व अमेरिकेतील तेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘तेलाचे मोठे साठे, नैसर्गिक वायू, तांबे, लिथियम, युरेनियम व इतर खनिजे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नाहीत, तर बलुचिस्तानात आहेत. बलुचिस्तान हा सार्वभौम देश आहे. आम्ही विकले जाणाऱ्यांपैकी नाही. पाकिस्तानच काय, चीन किंवा इतर कोणत्याही देशाला आमची नैसर्गिक साधन-संपत्ती ओरबाडू देणार नाही, असे मीर यार यांनी ठणकावले.’ ‘पाकिस्तीन सैन्याने ट्रम्प सरकारची दिशाभूल केली आहे. अमेरिकेला भूगोलाबद्दल चुकीची माहिती दिली आहे, असा दावाही त्यांनी पत्रात केला.’

हा जगाच्या सुरक्षेसाठी धोका

पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय ही गुप्तचर संघटना दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. बलुचिस्तानातील तेल आणि खनिज संपत्ती त्यांच्या हाती लागू देणे म्हणजे दहशतवादाला उत्तेजन देण्यासारखे आहे. ती घोडचूक ठरेल. जगाच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक आहे. पाकिस्तानला यातून पैसा मिळाल्यास जगभरात दहशतवादाचे जाळे पसरवण्यासाठी त्याचा वापर होईल. हा पैसा हिंदुस्थान इस्रायलच्या विरोधात वापरला जाईल. बलूच जनतेला याचा काडीचा फायदा होणार नाही, असा इशारा मीर यार यांनी दिला.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;