जुहूत लाखमोलाची कॅरम स्पर्धा
जुहू विले पार्ले जिमखाना तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने येत्या 16 ते 18 ऑगस्टदरम्यान जुहू विलेपार्ले जिमखाना येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 8 खेळाडूंना मिळून एपंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे सायंकाळी 6 ते 8 दरम्यान उपलब्ध असून इच्छुकांना 6 ऑगस्टपर्यंत नावे नोंदवता येतील. अधिक माहितीसाठी 9987045429 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List