संचालक मंडळाची दुकानदारी थांबेना, पुणे बाजार समितीच्या सचिवांच्या वाहनाकडूनही वसुली

संचालक मंडळाची दुकानदारी थांबेना, पुणे बाजार समितीच्या सचिवांच्या वाहनाकडूनही वसुली

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाची दुकानदारी थांबायचे नाव घेत नाही. सभापती बदलताच बाजार आवारात पार्किंग शुल्काच्या नावाखाली बेकायदी वसुली जोरदार सुरू आहे. बटाटा शेड बेकायदा वसुलीचे केंद्र झाले आहे. या बेकायदा वसुलीतून बाजार समितीच्या सचिवांचे वाहनदेखील सुटले नाही. चार नंबर गेट येथे सचिवांच्या वाहनाकडूनच बेकायदा वसुली केली आहे. कारवाई करणार्‍यांकडूनच वसुली होत असल्याने संचालक मंडळाची दुकानदारी कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थि झाला आहे.

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाने मनमानी पध्दतीने टेंडर वाटप केले आहे. संचालक मंडळाच्या आशिर्वादामुळे ठेकेदारांनी ताळ सोडला आहे. त्यात सभापती बदलल्यापासून दुकानदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. समितीने प्रत्येक ठेकेदाराला पार्विंâग शुल्क वसुलीची जागा निश्चित करून दिली आहे. मात्र, यातील काही ठेकेदारांकडून ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त बेकायदा वसुली सुरूच आहे. या वसुलीतून बाजार समितीच्या सचिवांचे वाहनाचीही सुटका झालेली नाही. सचिवांचे वाहन ४ नंबर गेट परिसरात गेले असता जय जवान सिक्युरिटी ठेकेदाराच्या माणसाने संबंध नसतानाही पार्विंâग शुल्काच्या नावाखाली पावती फाडत २० रूपये वसुल केले. या वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिलेले असतानादेखील ही वसुली झाली. त्यामुळे संचालक मंडळाच्या दुकानदारीला कोण चाप लावणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

विभाग प्रमुखाला वर्गणी

बाजारातील वाहतुककोंडी, सुरक्षा आणि बेकायदा वसुलीसारखे प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी सुरक्षा अधिकार्‍यांची आहे. मात्र, बाजार समितीचा सुरक्षा विभाग गोरगरीबांवर कारवाईचा बडगा दाखवत त्यांचे साहित्य जप्त करून ते गायब करत आहेत. वरिष्ठ अधिकारी सुरक्षा विभागाला बेकायदा वसुली बंद करण्याच्या सूचना देतात. मात्र, वेळेला वर्गणी मिळत असल्याने विभाग प्रमुख त्याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे.

बाजार समितीने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी पार्विंâग शुल्क वसुलीची कोणालाही परवानगी दिलेली नाही. कर्मचारी संख्या वाढवून यावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
डॉ.राजाराम धोेंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पित्याच्या वेतनातून मुलीची कॉलेजची फी भरा, हायकोर्टाचे खासगी कंपनीला आदेश; इंजिनीअर होऊ न देणे दुर्दैवी पित्याच्या वेतनातून मुलीची कॉलेजची फी भरा, हायकोर्टाचे खासगी कंपनीला आदेश; इंजिनीअर होऊ न देणे दुर्दैवी
पती-पत्नीच्या वादात मुलीला इंजिनिअरिंग शिक्षण करू न देता अन्य पर्याय देणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी चिंता व्यक्त करत उच्च...
परराष्ट्र मंत्रालयाच्या बॅगेआड गांजाची तस्करी, 14 कोटी 73 लाख रुपये किमतीचा माल जप्त
अंधेरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांनी घेतला सहभाग
लिफ्ट कोसळली; जरांगे यांना दरवाजा तोडून बाहेर काढले
उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार
व्वा रे भाजपचे हिंदुत्व… महाराष्ट्राच्या महाउत्सवाआधी विघ्न, लालबागमध्ये गणेशभक्तांवर लाठीमार
शुभवार्ता!सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, रेल्वे भरणार 10 हजार पदे