टॅरिफचा तडाखा बसणार, लाखो नोकऱ्या जाणार; कापड उद्योगासह ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी ‘बुरे दिन’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जोरदार फटका हिंदुस्थानच्या उद्योगांना बसणार असून यामुळे ज्वेलरी इंडस्ट्री, कापड उद्योग (गारमेंट) मधील लाखो नोकऱ्या जाण्याची भीती वर्तवली जात आहे. ट्रम्प यांचा 25 टक्के टॅरिफ 7 जून 2025 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानातील कापड कारखाने चालू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करावी लागणार आहे. केवळ कापड उद्योगातील दोन लाखांहून अधिक नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती तज्ञानी वर्तवली आहे.
हिंदुस्थानी रेडिमेड गारमेंट एक्सपोर्टसाठी अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे. 2024 मध्ये अमेरिकेतील एकूण गारमेंट आयातीतील 33 टक्के भागीदाही ही हिंदुस्थानची होती. 2020 मध्ये ही भागीदारी केवळ 4.5 टक्के होती. परंतु, 2024 मध्ये ती 5.8 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. अमेरिकेला सर्वात जास्त निर्यात केल्या जाणाऱ्यांमध्ये एकूण कॉटन टी शर्टस् 9.71 टक्के, महिला आणि मुलींसाठी कॉटन ड्रेनस 6.52 टक्के, मुलांसाठी कॉटन कपडे 5.46 टक्के आहे. परंतु, नव्या टॅरिफमुळे कापड उद्योगाला फटका बसणार आहे.
ज्वेलरी इंडस्ट्री संकटात
अमेरिकेच्या नव्या 25 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानातील ज्वेलरी इंडस्ट्री संकटात सापडली आहे. टॅरिफचा हँडमेड ज्वेलरी निर्यातीवर वाईट परिणाम होणार आहे. याआधी 10 टक्के टॅरिफ लावला होता. तर त्यावेळी 50 हजार नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. आता हा टॅरिफ 25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे एक लाखांहून अधिक नोकऱ्या जातील, अशी भीती आहे, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊंसिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List