ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील

ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील

स्व. आर.आर.आबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, अशी मागणी आज विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली.

विधानसभेत बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, “ऑनलाईन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत आहे. तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. यात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.”

कैलास पाटील म्हणाले, या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेम बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कायदे अस्तित्वात नाहीत. परंतु, ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सुतोवाच केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स