कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या काळातील एक रंजक किस्सा सांगितला.
कपिल शर्माने अरुणा ईरानी यांना प्रश्न विचारला की, त्यांनी कधी कोणाशी फ्लर्ट केलं आहे का? यावर अरुणा यांनी सांगितलं की, त्यांनी कपूर खानदानातील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फ्लर्ट करण्यासाठी चक्क रीटेक घेतले होते.
अरुणा ईरानी यांनी सांगितलं की, त्या 'फकीरा' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होत्या, जो 1976 मध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी त्यांचं मन शशि कपूर यांच्याकडे आकर्षित झालं आणि त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही.
त्यांनी सांगितलं की, चित्रपटात एक दृश्य होतं, ज्यामध्ये त्यांना शशि कपूर यांना घट्ट मिठी मारायची होती. सीन शूट झाल्यावर दिग्दर्शकाने 'कट' म्हटलं, पण त्यानंतर अरुणा यांनी दिग्दर्शकाला रीटेक घेण्याची विनंती केली.
अरुणा यांनी पुढे सांगितलं की, रीटेकची मागणी केल्यावर शशि कपूर यांनीही त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, "तू रीटेक का घेते आहेस?" यावर अरुणा यांनी उत्तर दिले "आपण रीटेक मागू शकतो, तर मी का नाही?
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List