वडिलांना मारहाण केली, आईने घराबाहेर काढलं आणि…, उषा नाडकर्णी यांचा धक्कादायक खुलासा
Usha Nadkarni Career: फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःची ओळख भक्कम करणाऱ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेनंतर मात्र त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आज उषा नाडकर्णी यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण त्यांच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. करीयरच्या सुरुवाती त्यांनी अनेक प्रसंगांचा साना करावा लागला. वडिलांनी अभिनेत्रीला मारहाण केली तर, आईने घराबाहेर काढलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
विनोदवीर भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये उषा नाडकर्णी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘मी नाटकात सिनेमांमध्ये काम केलेलं माझ्या आईला बिलकूल आवडत नव्हत. वडिलांकडून नकार नव्हता. पण आई शिक्षिका असल्यामुळे तिचा नकार होता आणि ती तिच्या जागी बरोबर होती..’
‘नाटकात काम करत असल्यामुळे घरी येण्याच्या माझ्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. त्यामुळे एक दिवस आईने माझे कपडे घराबाहेर फेकले आणि म्हणाली नाटकात काम करायचं असेल तर आमच्या घरातून निघून जा. मी देखील प्रचंड रागात होती. मी माझे सर्व कपडे गोळा केले आणि ग्रांट रोड पूर्वेला गेली.’
‘तेथून एक बॅग घेतली माझे सर्व कपडे त्या बॅगेत भरले आणि माझी एक मैत्रीण तेथे राहत होती तिच्याकडे गेली. तेव्हा माझे पप्पा मला शोधत माझ्या ऑफिसपर्यंत आले. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. मी तेव्हा असेल 18 – 19 वर्षांची…’ एवढंच नाही तर, त्यांनी एक किस्सा देखील सांगितला. जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना मारलं होतं.
लता मंगेशकर यांनी आयोजित केलेल्या गणपती उत्सवात जेव्हा उषा यांनी नृत्य केलं. हे उत्सव रस्त्यावर होत असत आणि उषा यांना त्यात सहभागी होणं खूप आवडायचं, पण त्यांच्या वडिलांना ते अजिबात आवडले नाही. त्या म्हणाल्या, ‘पप्पा मला शोधत आले आणि कार्यक्रमात मला पाहिल्यानंतर त्यांनी मला मारलं आणि घरी आणलं. आम्ही दोन बहिणी आणि दोन भाऊ होतो… जेव्हा पप्पा कोणा एकाला मारायचे तेव्हा बाकी तीन घराबाहेर पळून जायचे…’ असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List