मठात गेलो आणि पायऱ्या चढत असताना…, मठात गेल्यानंतर अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला विलक्षण अनुभव

मठात गेलो आणि पायऱ्या चढत असताना…, मठात गेल्यानंतर अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला विलक्षण अनुभव

अशक्य ही शक्य करतील स्वामी || जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय…, संकट काळात स्वामी समर्थांचा तारक मंत्र जगण्यासाठी नवी उमेद देतो. जगभरात स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि प्रत्येकाला स्वामी आपल्या सोबत कायम आहेच ही प्रचिती येत असते. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..!’ स्वामींचे हे शब्द कुठे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मठात जात असतात. स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी मठात गेलेल्या अभिनेत्रीच्या पतीला देखील विलक्षण अनुभव आला, तो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा नवरा मेहुल पै याला स्वामींच्या मठात गेल्यानंतर विलक्षण अनुभव आला. मेहुल याने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. सध्या महुल याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… त्याच्या पोस्टवर स्वामी भक्त देखील ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणत कमेंट करत आहे.

मेहुल पै आलेला अनुभव सांगत म्हणाला, आजचा माझा दिवस आणि अनुभव,,,19 एप्रिल 2025… आजचा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता. मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता… आणि तेव्हा जाणवलं, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, “मी आधी स्वामींच्या पायांपडतो, मग माझी बॅग धरतो… आता तू पायांपड.” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शन गेलं. मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Meihul R Paii (@mehul_pai)

 

दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत, गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, “थोडा वेळ थांबशील का मी उपासना करे पर्यंत ? मी थांबलो… आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं, “घरी कोण-कोण आह रे तुझ्या ?” मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर, ते म्हणाले, “येत्या 24 एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग… आणि मग परत मठात ये. इथेच स्वामींपुढे ती ठेव. आणि बघ… लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” थोड्या वेळाने, ते हसत म्हणाले, “तू कुठे चाललायस?” आणि शेवटी हळुवारपणे विचारलं -“थोडं पुढे रस्ता क्रॉस करून देशील का?”

असं झालं आज स्वामींचं दर्शन… एक साधा वाटणारा प्रसंग… पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करून गेला. कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते… “स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात… आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही.” सध्या मेहुल पै याची पोस्ट चर्चेत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी...
सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर