6 कोटींची कार, 100 कोटींचं घर… फक्त सौंदर्यावरच जाऊ नका; इतकी श्रीमंत आहे प्रसिद्ध अभिनेत्री रेखा
प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिची दिग्गज अभिनेत्रींमध्ये गणना होते. कसदार अभिनय, मनमोहक नृत्य आणि अभिजात सौंदर्याच्या बळावर रेखा यांनी बॉलिवूडवर अधिराज्य केलं आहे. 70 च्या दशकात रेखाचा फिल्मी प्रवास सुरू झाला. वयामुळे त्या सिनेमात अधिक सक्रिय नसतात. पण अधूनमधून त्यांचं दर्शन सिनेमातून होतच असतं. या शिवाय सर्व फिल्मी पुरस्कार सोहळ्यात रेखा या आवर्जुन हजेरी लावतात. त्यामुळे जुन्या अभिनेत्रींपैकी रेखा या नेहमीच चर्चेत असतात.
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस सिनेमे देऊन रेखा यांनी बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवलं. रेखा यांनी लोकप्रियतेबरोबरच प्रचंड पैसाही कमावला आहे. रेखा यांची संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण त्यांनी कधी संपत्तीचा बडेजाव केला नाही. कोणत्याही वादात कधी अडकल्या नाहीत. रेखा यांची संपत्ती नेमकी किती आहे? त्यांच्याकडे 6 कोटी रुपये किंमत असलेली कार कोणती आहे? यावरच आपण आज प्रकाश टाकणार आहोत.
वाचा: काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला धमकी दिली
रेखांचे सिनेमे
70 वर्षीय रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954मध्ये चेन्नईत झाला होता. तुलुगु सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली. तर 1970मध्ये आलेल्या सावन भादो सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी असंख्य हिट सिनेमे दिले आहेत.
‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘खूबसूरत’, ‘घर’, ‘नमक हराम’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’, ‘जीवन धारा’, ‘उमराव जान’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘लज्जा’, ‘जुदाई’, ‘प्यार की जीत’, ‘बहूरानी’, ‘दो अनजाने’, ‘बीवी हो तो ऐसी’ आणि ‘कोई मिल गया’ या त्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ‘यमला पगला दीवाना फिर से’ (2018) या सिनेमातील गाण्यात त्या शेवटच्या दिसल्या होत्या.
6 कोटीच्या कारमधून प्रवास
रेखा यांच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत. यात 6.01 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट ही कार आहे. याशिवाय त्यांच्याकडे ऑडी ए8 (1.63 कोटी), मर्सिडीज-बेंज एस-क्लास (2.17 कोटी) आणि 2.03 कोटीवाली बीएमडब्ल्यू आय 7 इलेक्ट्रिक कार सुद्धा आहे.
332 कोटी नेटवर्थ, 100 कोटीचं घर
रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये चांगलीच कमाई केली आहे. त्या दीर्घकाळ सिनेमापासून दूर होत्या. तरीही त्यांची नेटवर्थ ऐकून तुम्हाला झटका बसेल. रेखा यांचा मुंबईत बँड स्टँड येथे 100 कोटीचा बसेरा नावाचा बंगला आहे. त्यांची एकूण संपत्ती 332 कोटी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List