जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याची मोठी कारवाई, पाच दहशतवाद्यांची घरे ब्लास्ट करुन केली उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याची मोठी कारवाई, पाच दहशतवाद्यांची घरे ब्लास्ट करुन केली उद्ध्वस्त

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी सैन्य अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. सुरक्षा दलांनी पुलवामा, शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची पाच घरे उद्ध्वस्त केली आहेत. दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय दहशतवादी कमांडर शाहिद अहमद कुटे याचे घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केले. शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सक्रिय आहे आणि अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. शुक्रवारी रात्री सुरक्षा दलांनी कुलगाममधील क्विमोह येथील दहशतवादी झाकीर घनीचे घरही उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी एकूण पाच दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

तसेच शुक्रवारी पुलवामामध्ये हिंदुस्थानी सैन्याने आणखी एका दहशतवाद्याचे घर उद्ध्वस्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी एहसान उल हकचे घर जमीनदोस्त करण्यात आले. याआधी सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील गोरी भागात एका दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवून देण्यात आले, तर दुसऱ्या संशयिताचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जागर – तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती जागर – तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. अलीकडे आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे...
किस्से आणि बरंच काही- कराओके… पैसे द्या, गाणे गा!
भाषांतरासाठी एआयचा वापर सुरू करा! सुप्रीम कोर्टाची हायकोर्टांना महत्त्वपूर्ण सूचना
तिचे जग- जग गांभीर्याने विचार करेल?
स्मरण- लेखक-कलावंतांची भूमिका
न्यायालयाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले; उपजिल्हाधिकाऱयांच्या पदावनतीचे आदेश
कांदिवलीत औद्योगिक इमारतीला आग; सुदैवाने कुणीही जखमी नाही