डिलिव्हरीनंतर तासाभरात अडीच कोटींची फेरारी कार जळून खाक, 10 वर्षांतील पैशांच्या बचतीची राखरांगोळी

डिलिव्हरीनंतर तासाभरात अडीच कोटींची फेरारी कार जळून खाक, 10 वर्षांतील पैशांच्या बचतीची राखरांगोळी

जपानमध्ये एका व्यक्तीने आवडती फेरारी कार खरेदी करण्यासाठी 10 वर्षे पैशांची बचत केली. या बचतीमधून साठवलेले पैसे घेऊन फेरारी कारचे शोरूम गाठले. आवडती फेरारी कार खरेदी केली, परंतु अवघ्या तासाभरात ही कार जळून खाक झाल्याने या व्यक्तीच्या स्वप्नांची जणू राखरांगोळी झालीय. ही घटना जपानमध्ये घडली आहे. संगीत निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या होनका@नने जवळपास 10 वर्षांपासून पैशांची बचत करत 43 दशलक्ष जपानी येन म्हणजेच जवळपास 2.5 कोटी रुपये जमवले होते. हे पैसे जमवल्यानंतर त्याने फेरारी 458 ही स्पायडर कार खरेदी केली. होनका@न याने 16 एप्रिलला कारची डिलिव्हरी घेतली. दीडच्या सुमारास शोरूममधून बाहेर पडल्यानंतर अडीचच्या सुमारास कारमधून धूर येत असल्याचे त्याला दिसले, परंतु हा धूर फेरारीच्या इंजिनमधून येत होता. त्याने तातडीने कार रस्त्याच्या कडेला थांबवली, परंतु अवघ्या काही मिनिटांत कारने पेट घेतला आणि कार बघता बघता जळून खाक झाली. होनकानने सोशल मीडिया एक्सवर सविस्तर लिहिले आहे.

स्वप्नावर फिरले पाणी

एखादी नवी कोरी कार शोरूममधून घरी आणणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. होनका@ननेसुद्धा 10 वर्षांपासून हे स्वप्न पाहिले होते. त्याने दररोज पैशांची बचत करत ही कार खरेदी केली होती, परंतु अवघ्या एका तासात स्वप्नातील कार जळून खाक झाल्याने होनका@नला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या कारला कोणतीही धडक बसली नव्हती. या कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. फेरारीच्या डिपार्टमेंटने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर
हिंदुस्थानने जैलसलमेरमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यातील पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप या पायलटबाबतची कोणतीही माहिती समोर...
Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
Big Breaking Operation Sindoor- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
देशाच्या सार्वभौमत्वाचे व जनतेचे संरक्षण करायला आम्ही पूर्णपणे तयार, हिंदुस्थानी संरक्षण दल सज्ज
Opertion Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) केली नष्ट
Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर