यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, राज्यातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

यूपीएससीत महाराष्ट्राचा झेंडा, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, राज्यातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पुण्याच्या अर्चित डोंगरे याने महाराष्ट्राचा झेंडा रोवत देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे हिने देशात प्रथम येत अव्वल कामगिरी बजावली. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या पाच जणांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे.

राज्यातून 90हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वा रँक मिळाला आहे. पहिल्या 100मध्ये राज्यातील सात उमेदवार आहेत. यूपीएससीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात नियुक्तीसाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यात हरियाणाची हर्षिता गोयल दुसऱया क्रमांकावर झळकली आहे. शक्ती दुबे ही अलाहाबाद विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवीधर (बॅचलर ऑफ सायन्स) आहे. तिने यूपीएससीसाठी राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध पर्यायी विषय म्हणून निवडले होते.

राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्चित पराग डोंगरे (03), शिवांश सुभाष जगदाळे (26), शिवानी पांचाळ (53), अदिती संजय चौघुले (63), साई चैतन्य जाधव (68), विवेक शिंदे (93), तेजस्वी प्रसाद देशपांडे (99), दीपाली मेहतो (105), ऐश्वर्या मिलिंद जाधव (161), शिल्पा चौहान (188), कृष्णा बब्रुवान पाटील (197), गौरव गंगाधर कायंदे पाटील (250), मोक्ष दिलीप राणावत (251), प्रणव कुलकर्णी (256), अंकित केशवराव जाधव (280), आकांश धुळ (295), जयकुमार शंकर आडे (300), अंकिता अनिल पाटील (303), पुष्पराज नानासाहेब खोत (304), राजत श्रीराम पात्रे (305), पंकज पाटले (329), स्वामी सुनील रामलिंग (336), अजय काशीराम डोके (364), श्रीरंग दीपक कावोरे (396), वद्यवत यशवंत नाईक (432), मानसी नानाभाऊ साकोरे (454), केतन अशोक इंगोले (458), बच्छाव कार्तिक रवींद्र (469), अमन पटेल (470), संकेत अरविंद शिंगाटे (479), राहुल रमेश आत्राम (481), चौधर अभिजीत रामदास (487), बावणे सर्वेश अनिल (503), आयूष राहुल कोकाटे (513), बुलपुंडे सावी श्रीकांत (517), पांडुरंग एस. कांबळी (529), हृषीकेश नागनाथ वीर (556), श्रुती संतोष चव्हाण (573), रोहन राजेंद्र पिंगळे (581), अश्विनी संजय धामणकर (582), अबुसलिया खान कुलकर्णी (588), सय्यद मोहम्मद आरीफ मोईन (594), वेदांत माधवराव पाटील (601), अक्षय विलास पवार (604), दिलीपकुमार कृष्ण देसाई (605), गायकवाड हृषीकेश राजेंद्र (610), स्वप्नील बागल (620), सुशील गिट्टे (623), सौरव राजेंद्र ढाकणे (628), अपूर्व अमृत बलपांडे (649), कपिल लक्ष्मण नलावडे (662), सौरभ येवले (669), नम्रता अनिल ठाकरे (671), ओंकार राजेंद्र खुंताळे (673), यश कनवत (676), बोधे नितीन अंबादास (677), ओमप्रसाद अजय पंधारे (679), प्रांजली खांडेकर (683), सचिन गुणवंतराव बिसेन (688), प्रियंका राठोड (696), अक्षय संभाजी मुंडे (699), अभय देशमुख (704), ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707), विशाल महार (714), अतुल अनिल राजुरकर (727), अभिजित सहादेव आहेर (734), भाग्यश्री राजेश नायकेले (737), श्रीतेश भूपेंद्र पटेल (746), शिवांग अनिल तिवारी (752), पुष्कर लक्ष्मण घोळावे (792), योगेश ललित पाटील (811), श्रुष्टी सुरेश कुल्ये (831), संपदा धर्मराज वांगे (839), मोहिनी प्रल्हाद खंदारे (844), सोनिया जागरवार (849), अजय नामदेव सरवदे (858), राजू नामदेव वाघ (871), अभिजय पगारे (886), हेमराज हिंदुराव पनोरेकर (922), प्रथमेश सुंदर बोर्डे (926), गार्गी लोंढे (939), सुमेध मिलिंद जाधव (942), आनंद राजेश सदावर्ती (945), जगदीश प्रसाद खोकर (958), विशाखा कदम (962), सचिन देवराम लांडे (964), आदित्य अनिल बामणे (1004)

अव्वल दहा

शक्ती दुबे, हर्षिता गोयल, अर्चित डोंगरे, मार्गी शाह, आकाश गर्ग, कोमल पुनिया, आयुषी बन्सल, राज कृष्ण झा, आदित्य अग्रवाल, मयंक त्रिपाठी

  • सप्टेंबर 2024मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेसाठी 14,627 उमेदवार पात्र ठरले. यापैकी 2,845 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. निवड झालेल्या 1,009 उमेदवारांपैकी 725 पुरुष आणि 284 महिला आहेत. खुल्या गटातील 335, आर्थिक दुर्बल घटक 109, इतर मागासवर्गीय 318, अनुसूचित जाती 160 आणि अनुसूचित जमातीतील 87 उमेदवारांचा समावेश आहे. तर 45 उमेदवार दिव्यांग श्रेणीतील आहेत.

शक्ती दुबे देशात अव्वल; भाऊ म्हणाला, देवाने तुला पहिल्या क्रमांकासाठी राखीव ठेवलंय

शक्ती दुबे पाचव्या प्रयत्नात यशस्वी झाली. मात्र तिने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. पहिला रँक मिळेल असे वाटले होते का, असे विचारले असता ती उत्तरली, मला अपेक्षा नव्हती. मात्र माझ्या भावाला विश्वास होता. गेल्या वेळेस माझी मुलाखतीकरिता निवड झाली नव्हती. तेव्हा, काळजी करू नको. देवाने तुला पहिल्या क्रमांकासाठी राखीव ठेवलंय, असे भाऊ म्हणाला होता. पालकांचा विश्वास असेल तर अपयश पचवता येते, असे ती म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक? Pakistan Asim Munir पाकिस्तानात अराजकता! लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक?
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना अटक झाल्याचे वृत्त सध्या समोर आले आहे. अद्याप पाकिस्तानकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली...
Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानवर 100 क्षेपणास्त्रे डागली, 4 लढाऊ विमाने पाडली, 3 वैमानिक ताब्यात
Operation Sindoor- हिंदुस्थानी सैन्याची कमाल, सीमेवर घमासान! 45 मिनिटे आकाशात ‘सूदर्शन’चा थरार; नंतर पाकिस्तानात तांडव
Operation Sindoor- पाकिस्तानने अमृतसरवर केलेला हल्ला, हिंदुस्थानी सैन्याने परतवुन लावला
Pakistan Attack Civilians पाकिस्तानचे नागरी वस्त्यांवर हल्ले, उरीमधील हॉटेलबाहेर मोठा धमाका
पाकिस्तान दुहेरी संकटात! बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ल्याला सुरुवात
पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर