IPL 2025: शुभमन गिल लवकरच चढणार बोहल्यावर, स्वतःच सांगितलं कधी करणार लग्न
IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेट शुभमन गिल कायम दमदार कामगिरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर, अनेक तरुणी देखील शुभमनच्या चाहत्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शुभमनच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेक जण शुभमनला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत असतात. असंच पुन्हा शुभमनसोबत झालं आहे. सोमवारी आयपीएल सामन्यादरम्यान, कमेंटेटरने त्याला विचारले की तो लग्न कधी करत आहे. या प्रश्नाचे शुभमनने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.
टॉस दरम्यान, डॅनी मॉरिसनने विचारलं, तू खूप देखणा दिसतोस, लग्न करत आहेस का? या प्रश्नाच्या उत्तरात शुभमन गिल प्रथम हसला आणि नंतर म्हणाला – असे काहीही नाही. सध्या सर्वत्र शुभमन गिल याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Toss
@KKRiders won the toss and elected to bowl against @gujarat_titans in Kolkata.
Updates
https://t.co/TwaiwD5D6n#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/Rof135hqli
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना केलंय अनफॉलो
गेल्या अनेक वर्षांपासून सारा आणि शुभमन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. सारा हिने शुभमन गिल याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. फक्त सारा हिनेच नाही तर, शुभमन गिल याने देखील साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर सारा आणि शुभमन यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
सारा तेंडुलकर – शुबमन गिल
सारा तेंडुलकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सारा कायम स्वतःचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.. तर शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे. शुबमन कायम त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List