अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेताला अभिनेत्री होऊ दिलं नाही? अखेर जया बच्चन यांनी खरं कारण सांगितलं
बॉलिवूडचे शेहनशाह म्हणजे अमिताभ बच्चन यांनी फिल्म इंडस्ट्रीला खूप काही दिलं आहे. त्यांच्या अभिनयाने आणि चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. अमिताभ बच्चन आजही या वयात तेवढ्याच उत्साहात काम करतात. त्याच उर्जेनं प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याने देखील वडिलांप्रमाणेच बॉलिवूडध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. अभिषेक नक्कीच एक चांगला अभिनेता आहे पण त्याला वडिलांप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर त्या पद्धतीची भुरळ पाडता आली नाही.
श्वेता बच्चनने अभिनयात नशीब का आजमावलं नाही?
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांचेदेखील अभिनयाच्या जगात नाव आहे. पण सर्वांनाच आश्चर्य वाटते की अभिनेत्यांनी भरलेल्या या कुटुंबातील मुलगी श्वेता बच्चन नंदा हिने अभिनयाच्या जगात का आपलं नशीब आजमावला नाहीये? याचं उत्तर अखेर जया बच्चन यांनी दिलं आहे.
कॅमेऱ्यासमोर येऊ इच्छित नाही
अनेकदा अशा चर्चा करण्यात आल्या की अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चनला अभिनेत्री होऊ दिले नाही, ज्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण जया बच्चन यांनी एका मुलाखतीत यावर उघडपणे उत्तर दिलं होतं. जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘श्वेताने कधीही अभिनयात रस दाखवला नाही. ती घरी खूप अॅक्टींग करते पण कॅमेऱ्यासमोर ती येऊ इच्छित नाही. ती तिच्या वडिलांसारखी खूप शांत आहे. जर श्वेताने स्वतः कधी अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असती तर आम्हाला आनंद झाला असता. मी स्वतः तिला प्रोत्साहन दिलं असतं आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली असती.”
एका नाटकादरम्यान श्वेताला आलेला वाईट अनुभव
दरम्यान श्वेताला जेव्हा तिच्या अभिनेत्री न होण्याबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा तिने एक किस्सा सांगितला होता ती म्हणाली होती ती शाळेत असताना तिने एकदा एका नाटकासाठी ऑडिशन दिले होते. हे नाटक तिला मिळालं तेव्हा सादरीकरण करताना तिचा ड्रेस फाटला आणि इतर मुलींसारखं तिला डान्सही करता आला नाही. त्यामुळे तिला फार रडू आलं होतं. नाटकातील तिला आलेल्या या वाईट अनुभवामुळे श्वेताने पुन्हा कधीही रंगमंचावर न जाण्याचा निर्णय घेतला. हेच कारण आहे की श्वेता अभिनयापासून दूर राहते आणि चित्रपटांमध्ये काम करत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List