आलिया भट्टच्या बहिणीचा प्रियकर ईशान मेहराचं या क्षेत्रात मोठं नाव; रणबीर कपूरसोबत आहे खास बॉंड
बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. नुकताच आलिया भट्टची लहान बहीण शाहीन भट्टही चर्चेत आली आहे. कारण अखेर तिने सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे आणि त्यांचे नाते अधिकृत केले आहे. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी आलिया भट्ट आणि धाकटी मुलगी शाहीन भट्ट. शाहीन लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. पण शाहीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, पण तिचा अभिनयाशी काहीही संबंध नाही. आलियाची बहीण पूर्णपणे प्रेमात असल्याचं तिच्या पोस्टवरून दिसून आलं.
शाहीन भट्ट ईशान मेहराच्या प्रेमात
शाहीनच्या बॉयफ्रेंडचे नाव ईशान मेहरा आहे. तिने ‘सनशाईन’ म्हणत ईशान मेहरासाठी वाढदिवसाची भावनिक शुभेच्छा पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये तिने तीन फोटो शेअर केले, त्यापैकी एक पार्कमधला ईशानसोबतचा तिचा सेल्फी होता. तिच्या हृदयस्पर्शी पोस्टद्वारे, शाहीनने केवळ त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही तर तिच्या त्याच्याबद्दलच्या प्रेमाची झलकही दाखवली.
याआधीही दोघांचा फोटो व्हायरल झाला होताे
2025 च्या सुरुवातीपासूनच, शाहीनने ईशानसोबतचा एक गोंस फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. आता हे अधिकृत झाले आहे की तो दुसरा तिसरा कोणी नसून ईशान मेहरा होता. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये ती एका यॉर्टवरील एका व्यक्तीच्या हातात हात घेऊन उभी असलेली दिसत आहे. त्या पोस्टमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की प्रेम तिच्या आयुष्यात प्रवेश करत आहे आणि तिची आई सोनी राजदानने आनंद व्यक्त केला होता. तेव्हापासून, त्या शाहीनच्या नात्याची चर्चा सुरू होती आणि लोक त्या खास व्यक्तीबद्दल जाणून घेण्यास इच्छूक होते.
ईशान मेहरा नक्की करतो तरी काय?
ईशानच्या इंस्टाग्राम बायोमध्ये तो माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि फिटनेस फ्रिक असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या क्रीडा पार्श्वभूमीव्यतिरिक्त, ईशानला लेखन आणि स्टँड-अप कॉमेडीसारख्या इतर क्षेत्रांमध्ये रस असल्याचे त्याने म्हटलं आहे. ईशान त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे स्पष्ट होतं की तो फार सोशल मीडियाप्रेमी नाही. त्यामुळे जीमरिलेटेड क्षेत्रात असल्याचं लक्षात येतं.
रणबीरसोबतही खास बॉंड
शाहीनने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी, त्याला आलिया भट्ट, रणबीर कपूर, नीतू कपूर आणि सोनी राजदान यांच्यासोबत अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि सुट्टीत त्यांच्यासोबत पाहिलं आहे.2025 चे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तोही थायलंडमध्ये भट्ट आणि कपूर कुटुंबांसोबत दिसला होता. त्यामुळे त्याचं आलिया आणि रणबीरसोबतही तेवढंच खास बॉंड असल्याचं लक्षात येतं.
शाहीनने तिच्या नात्याची घोषणा करताच, तिची बहिणी आलिया भट्ट आणि पूजा भट्ट यांनी इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया दिली. नीतू कपूर, वरुण धवन, अर्जुन कपूर, अनन्या पांडे यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्सही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List