‘फ्रँड्री’ फेम शालूने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, शारीरिक संबंधांपासून ते घटस्फोट, दुसऱ्या लग्नाबद्दल धर्माचे कठोर नियम
दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फ्रँड्री’ सिनेमात शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने नुकतंच धर्मांतर केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहेत. अभिनेत्रीचे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर अनेक चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. अशात ख्रिश्चन धर्मातील कठोर नियमांबद्दल जाणून घेवू… शारीरिक संबंधांपासून ते घटस्फोट, दुसऱ्या लग्नाबद्दल ख्रिश्चन धर्मात कठोर नियम आहेत.
महिलांच्या कपड्यांबद्दल कठोर नियम : ख्रिश्चन धर्मातील बायबल वाचणाऱ्या लोकांना हे माहित असले की, अध्याय 2:9 मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की महिलांचा पोशाख योग्य असावा. त्यांनी खूप चमकदार किंवा भडक कपडे घालू नयेत. लहान कपडे आणि महागड्या वस्तू टाळाव्यात.
मांसाहारी खाण्याबाबतचे नियम : लेविकट 10:11 नुसार, चुकूनही मासे किंवा समुद्री खाद्यपदार्थ खाऊ नयेत. असं मानलं जातं की या प्राण्यांना पंख नसतात. म्हणून, हे खाणे टाळावे.
पुनर्विवाहाचे नियम : 10:11-12 च्या अध्यायानुसार, घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार करणं देखील बंधनकारक आहे. ख्रिश्चन धर्मात दुसऱ्या लग्नाला परवानगी नाही.
घटस्फोटाबद्दल बोलणंही पाप : 1 क्रोथिएंस 7:10-11 अध्यायानुसार, स्त्रियांनी कधीही त्यांच्या पतीपासून वेगळे होऊ नये आणि त्यांनी कधीही त्यांच्यामध्ये घटस्फोटाचा मुद्दा उपस्थित करू नये.
चर्चमध्ये महिलांनी बोलण्याबाबतचे नियम : 1 क्रोथिएंसच्या 14 पॉइंट 3 4 अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की, चर्चमध्ये महिलांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यांनी हा नियम काटेकोरपणे पाळावा आणि जेव्हा त्यांना बोलण्यास सांगितलं जाईल तेव्हाच महिलांनी बोलावं.
दारू पिऊ नये : लेवीकटचा अध्याय 10:09 दारूवर आधारलेला आहे. . त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की कोणत्याही विशेष कार्यक्रमात किंवा कार्यक्रमात चुकूनही दारू पेये पिऊ नये.
लग्नाआधी शारीरिक संबंध: हेब्रियूजच्या 13:4 अध्यायानुसार, विवाहपूर्व संबंधांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ख्रिश्चन धर्मात विवाहपूर्व शारीरिक संबंध अनैतिक मानले जातात. असं म्हटलं जातं की लग्नानंतरच एखाद्याने आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवावेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List