इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर

इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर

Laxmikant Berde:  ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाला आज अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकर चाहत्यांचा आणि सिनेविश्वाचा निरोप घेतला. पण कलाकाराचा कधीच अंत होत नाही… असं म्हणतात ते अगदी खरं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आजही सिनेमे आणि काही व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये आहे. सोशल मीडियाच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दिली आहे. एकदा अभिनेते शेखर सुमन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलाखत घेतली होती. त्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Memeetry (@memeetry)

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांना शेखर सुमन विचारतात, ‘कधी कोणच्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर आकर्षित झालात का?’ यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, ‘आकर्षित तर झालोय… पण काय आपल्याला माहिती आहे ना मिळणारं नाही…’ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हाच विनोदी अंदाज प्रत्येकाला आवडतो…

पुढे लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आलं, ‘तुम्ही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. हिंदी सिनेमांमध्ये काम केलं… आता काही वेगळं करण्याची इच्छा आहे का? अभिनेता आहात तर आता नेता होण्याची इच्छा नाही होत का?’ यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, ‘सिनेमांमध्ये काम करणं मला सुरु ठेवायचं आहे.’

राजकारणाबद्दल विनोदी अंदाजात लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, ‘राजकारणात माझी काय गरज आहे. तेथे इतके विनोदवीर आहेत…’ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या उत्तरानंतर प्रत्येक जण पोट धरुन हसला… सध्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझा अंघोळ करतानाच व्हिडीओ…’, करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल ‘माझा अंघोळ करतानाच व्हिडीओ…’, करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. करुण शर्मा यांनी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल...
शोलेमधील सांभाच्या लेकींना पाहिलंत का? सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींनाही देतात टक्कर, हॉलिवूडमध्येही डंका
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी
IMD Alert – येत्या 5 दिवसांत महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान खात्याचा इशारा
Pahalgam Terrorist Attack – पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मूसाचा सुगावा लागला? सुरक्षा दलांना मिळाली गुप्त माहिती
भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना