अमिताभ बच्चन यांनी का सोडले राजकारण, चाहत्याने दिलेल्या त्या कागदावर काय लिहिले होते

अमिताभ बच्चन यांनी का सोडले राजकारण, चाहत्याने दिलेल्या त्या कागदावर काय लिहिले होते

Amitabh bachchan :  देशात सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत अनेक सेलिब्रिटी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण तुम्हाला माहितीये का की बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी देखील राजकारणात प्रवेश केला होता. पण नंतर त्यांना राजकारणातून माघार घेतली. काय आहे कारण जाणून घ्या.

81 वर्षीय अमिताभ बच्चन हे आज बॉलिवूडचे मोठे नाव आहे. आजही ते कोणतेही काम कोणत्याही तरुणाना लाजवेल इतक्या चपळाईने करतात. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनय क्षेत्रात अपयश येत होतं. त्यांचे चित्रपट चालत नव्हते. अशा वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात ते सक्रिय झाले. बच्चन कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी जुने संबंध आहेत. राजीव गांधी हे त्यांचे मित्र होते आणि ते त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते.

बोफोर्समुळे राजकारण सोडले?

8व्या लोकसभा निवडणुकीत अमिताभ बच्चन यांच्या बाजूने 68 टक्के मते घेत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ यांचे नाव आले होते. त्यानंतर त्यांनी जुलै 1987 मध्ये राजकारणाला अलविदा केले. अमिताभ यांनी राजकारण सोडण्याचे हे एकमेव कारण नव्हते. आसाममध्ये एक छोटीशी घटना घडली होती. ज्याने अमिताभ बच्चन यांना विचार करायला भाग पाडले आणि त्यांनी राजकारण सोडले. याचा उल्लेख खुद्द अमिताभ यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये केला होता.

आसाममध्ये चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरावे लागले

अमिताभ बच्चन यांनी आसाममध्ये काँग्रेसचा प्रचार करताना चुकीच्या निर्णयामुळे त्यांचे हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवावे लागल्याचे सांगितले होते. त्यानंतर पायलट आणि ते लगेच त्यातून बाहेर पडले. पण यादरम्यान, एका विद्यार्थी सुरक्षा कवच भेदून त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या हातात एक कागद दिला. ज्यावर काहीतरी लिहिले होते.

विद्यार्थ्याने दिलेल्या कागदावर काय लिहिले होते?

विद्यार्थ्याने बिग बी यांना दिलेल्या कागदावर लिहिले होते की, ‘बच्चन साहेब, मी तुमचा मोठा चाहता आहे, पण मी विरोधी पक्षासोबत आहे. कृपया हे राज्य सोडा. विद्यार्थ्याच्या या भावनिक आवाहनानंतर अमिताभ बच्चन यांना विचार करायला भाग पाडले. यामुळेच त्यांनी राजकारण सोडले.

सिमी गरेवालच्या शोमध्ये बोलताना अमिताभ यांनी राजकारण सोडण्यामागचं कारण सांगितले. ते म्हणाले की, मी राजकारणी नव्हतो आणि राजकारणात येण्याचा माझा निर्णय भावनिक होता. राजीव गांधी आणि आमचे कुटुंब मैत्रीपूर्ण होते, म्हणूनच मी मित्रासाठी राजकारणात प्रवेश केला. मी एक नवशिक्या होतो आणि त्याला पात्र नव्हतो. म्हणूनच मी अवघ्या तीन वर्षांत राजकारण सोडले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था