‘या’ सेलिब्रिटींनी अभिनयासाठी सरकारी नोकरीचा केला त्याग, आज आहेत गडगंज संपत्तीने मालक

‘या’ सेलिब्रिटींनी अभिनयासाठी सरकारी नोकरीचा केला त्याग, आज आहेत गडगंज संपत्तीने मालक

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. काही सेलिब्रिटींनी तर सरकारी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीच मागे वळून पाहिल नाही. ज्या सेलिब्रिटींनी नोकरी सोडल्यानंतर अभिनय विश्वात पदार्पण केलं, ते यशाच्या शिखरावर पोहोचले… आज अशाच अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतःचा मोर्चा अभिनयाकडे वळवला…

अभिनेते बलराज साहनी यांनी देखील सरकारी नोकरी सोडून स्वतःचा मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला. अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी बलराज साहनी सरकारी प्राध्यापक होते. आजही बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव सामिल आहे.

अभिनेते अमरीश पुरी यांनी देखील सरकारी नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनय विश्वात पदार्पण करण्यापूर्वी अमरीश पुरी एका विमा निगममध्ये सरकारी क्लर्क होते. आज अमरीश पुरी जगात नाहीत पण त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांमध्ये जिवंत आहे. आजही चाहत्यांमध्ये अमरीश पुरी यांच्या चर्चा रंगलेल्या असतात. अमरिश पुरी यांचे अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने आणि आनंदाने पाहतात.

अभिनेते राज कुमार यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूड विश्वात काम करण्यापूर्वी राज कुमार मुंबई पोलिसांत सब-इन्स्पेक्टर होते. आजही राज कुमार यांच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात.

अभिनेते शिवाजी साटम यांना देखील आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सीआयडी मालिकेमुळे शिवाजी साटम यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. बॉलिवूड विश्वात काम करण्यापूर्वी शिवाजी साटम एक सरकारी बँकेत कर्मतारी होते. शिवाजी साटम यांनी अनेक मालिका आणि सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.

दाक्षिणात्य सिनेविश्वातील सुपरस्टार रजनीकांत देखील एकेकाळी सरकारी नोकरी करत होते. बॉलिवूड विश्वात काम करण्यापूर्वी रजनीकांत बस कंडक्टर होते. आज रजनीकांत झगमगत्या विश्वातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय अभिनेते आहे. आजही रजनीकांत यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था