घर पे खेल रहे हो क्या? पंचांनी दोनदा वॉर्निंग दिल्यानंतर पंतचा पारा चढला, भर मैदानात कुलदीप यादववर भडकला
On
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहाटीच्या बरसापाला मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने ८१.५ षटकांत ६ बाद २४७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याला मैदानावरील पंचांनी दोनदा ‘टाईम वॉर्निंग’ दिली. यामुळे पंतचा पारा चढला आणि गोलंदाजीसाठी जास्तीचा वेळ घेणाऱ्या कुलदीप यादववर तो भडकला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
23 Nov 2025 14:05:27
हैदराबाद विमानतळाला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने बहरीन-हैदराबाद विमान मुंबईत वळवण्यात आले. रविवारी पहाटे 3 वाजता हैदराबाद विमानतळाला एक मेल आला....
Comment List