‘मानवी बॉम्ब’च्या धमकीनंतर जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवले
‘मानवी बॉम्ब’ची धमकी मिळाल्यानंतर शनिवारी जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय (आरजीआयए) विमानतळाला सकाळी एक धमकीचा ईमेल आला. यात विमानात मानवी बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, धमकीच्या ईमेलमध्ये एलटीटीई-आयएसआयच्या सदस्यांनी 1984 च्या मद्रास विमानतळ मोडस ऑपरेंडी स्टाईल स्फोटाची योजना आखली आहे, असे म्हटले आहे. इंडिगोच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन जारी करत या घटनेची पुष्टी केली आहे.
1 नोव्हेंबर रोजी जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान 6E 68 सुरक्षेचा धोका निर्माण झाल्याने मुंबईकडे वळवण्यात आले. प्रोटोकॉलनुसार संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली. विमानाची आवश्यक सर्व सुरक्षा तपासणी केल्यानंतर विमानाला पुढील उड्डाणांसाठी परवानगी देण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List