रामदेव बाबांनी सांगितले थंडीत मुळा खाण्याचे फायदे ? पाहा कोणते आहेत ते…
थंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मुळ्यात इतकी पोषण तत्वे आहेत की जी १०० आजारांवर उपचार करु शकतात.
रामदेव बाबा सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करुन हेल्थ संबंधी अनेक समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी रामदेव बाबांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन मुळ्याचे फायदे सांगितले आहेत. मुळात शंभर प्रकारच्या आजारांवर मुळा कसा उपयोगी आहे हे सांगितले. चला तर पाहूयात लेखात मुळाचे काय आहेत नेमके फायदे ?
पोषक तत्वांनी भरपूर मूळा
मुळा पोषक तत्वांनी भरपूर असतो. यात विटामिन सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि विटामिन बी-6 सारखे न्युट्रीशन आढळतात. याशिवाय मुळा फायबर,एंटीऑक्सीडेंट आणि ग्लूकोसायनोलेट्सचा देखील चांगला स्रोत आहे. यामुळे हा मुळा आरोग्यासाठी वरदान मानला जातो. परंतू रात्रीचा मुळा खाण्यापासून वाचले पाहीजे. कारण मुळा हा उष्ण आणि थंड असा दोन्ही गुणधर्माचा असतो. ज्यांनी सर्दी आणि खोकला असेल त्यांनी रात्रीचा मुळा खाऊ नये.
मुळ्याचे फायदे काय ?
जर एखाद्या व्यक्तीने २ ते ३ महिने सातत्याने मुळा खाल्ला तर तो जीवनात कधीही आजारी पडू शकत नाही असे रामदेव बाबांनी सांगितले. मुळा खाल्ल्याने लिव्हर, किडनी, आतडी, फुप्फुसे, हृदयापासून संपूर्ण डायझेशन एकदम परफेक्ट रहाते. मुळा सेवनाने वजन नियंत्रणात राहाते. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. वात, पित्त दोष होत नाहीत. बीपी, शुगरपासून अनेक आजार बरे होतात.
फॅट कटर म्हणतात …
रामदेव बाबा म्हणतात मुळा हा फॅटक कटरचे काम करतो. मुळा डायजेशनसाठी खूपच चांगला आहे. जर तुम्ही सकाळी उपाशी पोठी मुळा खाल्ला तर पचन यंत्रणा एक तंदुरुस्त होते. जर तुम्हाला सकाळी मुळा खायला जमले नाही तर कोणत्याही वेळी मुळा मीठ लावून बाजरीच्या भाकरी सोबत खावा. मुळा खावा आणि कोणत्याही आजाराला मूळापासून दूर करा असा सल्लाच रामदेव बाबांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List