आता भूकंपापासून वाचण्यासाठी गुगलचे नवे फिचर
भूकंपापासून वाचण्यासाठी आता गुगल नवीन फिचर घेऊन येत आहे. एखादा भूकंप येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांना एक धोक्याची सूचना मिळणार आहे. यामध्ये भूकंप झाल्यास युजर्संना सतर्क करण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे.
गुगलच्या म्हणणयानुसार हे फिचर 2020 पासून लॉन्च झाले असून त्यांनी 2 हजारहून अधिक भूकंप शोधले आहेत. 2023 मध्ये फिलीपिन्समध्ये 6.7 चा भूकंप शोधला आणि 2.5 दशलक्ष लोकांना अलर्ट पाठवून सतर्क केले. गुगल आता अलर्टसाठी शेअरिंग फिचरवर आणखी काम करत आहे, तेे झाले की युजर्स ओळखीच्या लोकांना तो अलर्ट पाठवू शकतात. जेणेकरुन नैसर्गिक आपत्तीची माहिती लोकांपर्यंत तत्काळ पोहोचेल.
मीडिया वृत्तानुसार, अॅण्ड्रॉईडच्या भूकंप अलर्टमध्ये शेअर अलर्ट पर्याय जोडला जात आहे. युजर्स ते एका टॅपने सोशल मीडिया आणि इतर अॅपवर शेअर करु शकतात.ज्यामुळे त्यांना आश्रय घेण्यासाठी किंवा सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List