वाडा तालुक्यातील आंबिस्ते आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
वाडा तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आत्महत्या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.
देविदास परशुराम नवले( 15)इयत्ता दहावी व मनोज सिताराम वड (14) इयत्ता नववी अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थांची नावे असून ते बिवळपाडा व दापटी ता.मोखाडा येथील रहिवासी आहेत.
आंबिस्ते येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेची दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून सुमारे 450 विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेत आहेत. बुधवार( दि.8)रोजी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपून गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास येथील सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजुच्या आवारात देखरेख करीत असताना त्याला काहीतरी झाडाला लटकत असताना दिसले. त्यानंतर तो झाडाच्या जवळ गेला असता दोन विद्यार्थी झाडाला गळफास घेऊन लटकत असल्याचे त्याला दिसले त्यानंतर त्याने शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक व इतर शिक्षकांना उठवले. त्यांनीही गावातील पोलीस पाटील सरपंच यांना बोलावून वस्तूस्थिती दाखवली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले पोलीस आल्यानंतर लगेचच त्यांना झाडावरून उतरवून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत दोन्ही विद्यार्थी मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.विद्यार्थांनी आत्महत्या नक्की का केली याचे कारण समजू शकलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List