आरडाओरडा केलास तर बघ… पत्नीनं झोपलेल्या पतीवर ओतलं उकळतं तेल, जखमांवर टाकलं तिखट

आरडाओरडा केलास तर बघ… पत्नीनं झोपलेल्या पतीवर ओतलं उकळतं तेल, जखमांवर टाकलं तिखट

नवी दिल्लीतील मदनगीर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. औषध कंपनीत काम करणाऱ्या एका २८ वर्षीय कर्मचाऱ्यावर त्याच्या पत्नीने उकळते तेल ओतले. आणि त्यानंतर तिने त्याच्यावर लाल तिखटही टाकले. यामुळे त्या तरूणाला गंभीर दुखापत झाली. ही संपूर्ण घटना 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश असे त्या पीडित मुलाचे नाव असून तो एका औषध कंपनीत काम करतो. दिनेश, त्याची पत्नी आणि त्यांटची 8 वर्षांची मुलगी असा त्यांचा परिवार आहे. 2 ऑक्टोबर रोजी काम संपवून उशिरा घरी परतला होता. त्यानंतर त्याने जेवण केले आणि मग झोपी गेला. यावेळी अचानक पहाटे 3 च्या सुमारास त्याला अचानक अंगावर जळजळ आणि वेदना जाणवल्या. त्यामुळे तो हडबडून जागा झाला. यावेळी त्याने जे दृष्य पाहिलं त्यामुळे तो घाबरून गेला होता.

दिनेशने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, तो जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याची पत्नी त्याच्या अंगावर उकळत तेल टाकत होती. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने वरून तिखट मसालाही टाकला. त्यामुळे त्याच्या शरिरावर अनेक दखमा झाल्या. स्वत: ला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होता. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्याला धमकी दिली की, जर जास्त आवाज केलास तर आणखी तेल ओतेन…. पण दिनेश मदतीसाठी आरडोओरडा करतच होता. त्यामुळे त्याचा आवाज एकून आजूबाजूवाले दिनेशच्या मदतीसाठी धावून आले.

जेव्हा शेजारी दिनेशच्या मदतीसाठी गले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे ते दिनेशची मदत करू शकले नाही. दरमयान काही वेळाच्या अथक प्रयत्नांनतर दिनेशला बाहेर काढले. यावेळी तो गंभीर भाजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्य़ाचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केला असून आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND W Vs NZ W – अगदी थाटात; न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या पोरींची सेमी फायनलमध्ये धडक IND W Vs NZ W – अगदी थाटात; न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या पोरींची सेमी फायनलमध्ये धडक
सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवला आहे. प्रथम फलंदाजांनी...
‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय