मोदीजी, धारावीत या… आमच्या वेदना समजून घ्या! धारावीकरांची पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी

मोदीजी, धारावीत या… आमच्या वेदना समजून घ्या! धारावीकरांची पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी

धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती अदानींच्या माध्यमातून राबवून सामान्य धारावीकरांची फसवणूक होत आहे. धारावीकरांच्या मागण्यांकडे सरकार आणि अदानींकडून पूर्णपणे दुर्लक्ष होऊन मनमानीच केली जात आहे. त्यामुळे धारावीकरांना आपल्या भवितव्याबद्दल संभ्रम आहे. आपल्याला बेघर केले जाईल अशी भीती त्यांना सतावत आहे. दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावीलाही भेट द्यावी आणि धारावीतील झोपडपट्टीवासीयांच्या या वेदना जाणून घ्याव्यात, अशी कळकळीची विनंती धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना ई-मेल पाठवण्यात आला आहे. पंतप्रधानांनी धारावीचाही दौरा करा अशी विनंती त्यात करण्यात आली असल्याचे आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. धारावीच्या विकासाला धारावी बचाव आंदोलन या संघटनेचा विरोध नाही. पण सध्या जो एकतर्फीपणे धारावीचा विकास चालू आहे त्याला आमचा विरोध आहे, असे त्या ई-मेलमध्ये अधोरेखित करण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.

सर्व पात्र-अपात्र लोकांना धारावीतच 500 चौ.फु.ची घरे, दुकाने-गाळे द्या, धारावीतील पाच हजार लघुउद्योगांसाठी लघुउद्योग पार्क उभे करा, पुंभार, कोळी बांधवांना व्यवसायाप्रमाणे जागा द्या अशा धारावी बचाव आंदोलन या संघटनेच्या मागण्या आहेत याकडेही मेलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या मागण्या राज्य शासन आणि अदानी कंपनीने अजून मंजूर केलेल्या नाहीत. या मागण्यांबाबत मोदी यांनी आमच्या धारावी बचाव आंदोलन संघटनेशी चर्चा करावी अशीही मागणी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

nजेथे झोपडपट्टी तेथेच त्या  झोपडपट्टीचा विकास असे राज्य शासनाचे वर्षांनुवर्षाचे धोरण आहे. अदानी कंपनीने धारावीतच धारावीचा विकास करावा. धारावीतच  झोपडपट्टीवासीयांना घरे बांधून द्यावीत असे धोरण असतानाही अदानी कंपनीस मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, देवनार डम्पिंग ग्राऊंड व कुर्ला मदर डेअरी आदी ठिकाणची सुमारे 900 एकर जागा कशासाठी दिल्या, असा सवाल माने यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय ‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
तुमच्यापैकी अनेकजण डोकेदुखीने त्रस्त असाल. काही लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असतात, मात्र हे मायग्रेन किंवा हाय ब्लड प्रेशर या गंभीर...
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय
अमेरिकेत हिंदुस्थानी ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं, तिघांचा मृत्यू; घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद