राज्य व जिल्हा सहकारी बँका आता बँकिंग लोकपालच्या कक्षेत
राज्य व जिल्हा सहकारी बँकांनाही आता बँकिंग लोकपाल योजना लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेने तसे परिपत्रक काढले असून 1 नोव्हेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्य व जिल्हा बँकांच्या कोटय़वधी ग्राहकांना होणार आहे. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
रिझर्व्ह बँकेने 1995 साली बँकिंग लोकपाल योजना सुरू केली. ही योजना राष्ट्रीयीकृत व शेडय़ुल्ड बँकांच्या ग्राहकांपुरती मर्यादित होती. जिल्हा व राज्य सहकारी बँकांच्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांना आपल्या बँकेविरुद्ध रिझर्व्ह बँकेकडे दाद मागता येत नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन आरबीआयने लोकपालच्या कार्यकक्षेत वाढ केली आहे. त्यामुळे जिल्हा व राज्य बँका अधिक पारदर्शीपणे व जबाबदारीने हाताळतील, अशी आरबीआयची अपेक्षा आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या सर्व ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा मिळेल. बँकांवरील त्यांचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे विद्याधर अनास्कर यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List