निवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी खूशखबर, किमान पेन्शन 2500 रुपये!
ईपीएफओशी जोडलेल्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सला यंदाच्या दिवाळीत खास भेट मिळणार आहे. ईपीएस-95 (कर्मचारी पेन्शन योजना 1995 ) अंतर्गत किमान पेन्शनध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर निवृत्त कर्मचाऱ्याला महिन्याला किमान 2500 रुपये पेन्शन मिळेल. सध्या किमान पेन्शन 1000 रुपये आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. ही बैठक केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यात किमान पेन्शन वाढ, ईपीएफ आणि ईपीएस खात्यांमध्ये सुधारणा व इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. विविध कामगार संघटना 7 हजार रुपये पेन्शन मिळावे अशी मागणी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List